रामेश्वर तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम..

 रामेश्वर तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम..

टाळ – मृदुंगात गणेश विसर्जन , सर्वधर्मसमभावाची शिकवण…
देविदास गोरे
रुईछत्तिशी – गावातील रामेश्वर तरुण मंडळ गेल्या पाच ते सहा वर्षांपासून समाजात अनोखा उपक्रम सादर करत आहे.आधुनिक जगात वावरत असताना अनेक तरुण मंडळे डिजेच्या तालावर डामडौल करताना दिसून येतात. गुलालाची उधळण करत कर्नकश आवाजात गणेश विसरून करुन तरुण मंडळी बेभान होताना दिसून येते.  रामेश्वर मंडळाने टाळ – मृदुंगाच्या साहाय्याने गणेश विसर्जन करून धार्मिक पद्धतीची जाणीव करुन दिली आहे.गावातील सकल समाजाची तरुण मंडळी एकत्र येऊन सर्वधर्मसमभाव शिकवण देत समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.सर्व तरुण मंडळींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला हा गणेशोत्सव वेगळेपणाचे प्रतीक ठरले आहे.
            मुळेवाडी ता.कर्जत येथील धार्मिक संस्थेतील वारकरी मुलांनी गणेशाची मिरवणूक काढताना अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण केले होते.सर्व समाजातील तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव व इतर सामाजिक उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे हाच यामागचा संदेश आहे असे जाणवते.नगर तालुका पोलिस स्टेशनतर्फे या मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले.
“गावातील सर्व तरुण मंडळींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.दरवर्षी याच पद्धतीने गणेशाचे विसर्जन करुन सर्व समाजाचे तरुण एकत्र येत असतात.
.सोमनाथ गोरे , ग्रामपंचायत सदस्य.
“आम्ही सर्व धर्माचे तरुण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो.पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला हा उत्सव तरुण बांधव एकजूट राहण्याचा संदेश आहे
बाबाजान शेख , तरुण कार्यकर्ते , रुईछत्तिशी.
“आजकाल सामाजिक उत्सव धार्मिक आणि अध्यात्मिक पद्धतीने साजरे करणे काळाची गरज आहे.भक्तीमय वातावरण निर्मिती हाच या मागचा प्रमुख उद्देश आहे.
 रविंद्र भापकर , माजी उपसभापती , पंचायत समिती , नगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *