नगर तालुक्यात ठाकरे सेनेची होऊ द्या चर्चा संवाद अभियान…
नगर तालुका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांची माहिती…
देविदास गोरे
रुईछत्तिशी – सध्या राज्यात भाजपा , शिंदे सेना , अजित पवार राष्ट्रवादी गटाची सत्ता असताना राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत तसेच केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.तरुण बेरोजगारी , महागाई , हुकूमशाही पद्धतीने निर्णय या सर्व गोष्टींची सामान्य जनतेपर्यंत पोलखोल व्हावी.सामान्य जनतेला भाजपने वेठीस धरून आश्वासनांची पूर्तता न केल्याने संतापाची लाट पसरली आहे असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी नगर तालुका ठाकरे सेनेने होऊ द्या चर्चा अभियान सुरू केले आहे अशी माहिती नगर तालुका उबाठा प्रमुख राजेंद्र भगत यांनी दिली आहे.येत्या ३० सप्टेंबर पासून तर १५ ऑक्टोबर पर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे. दरेवाडी जिल्हा परिषद गटापासून सुरुवात होणार असून नागरदेवळे जिल्हा परिषद गटात कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू होणार असून शिवसेना उपनेते साजन पाचपुते , माजी जिल्हा परिषद सदस्य , उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले , माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे , पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे , माजी सभापती संदीप गुंड , माजी सभापती रामदास भोर , युवा सेना तालुका प्रमुख प्रविण गोर , उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट आदी पदाधिकारी कार्यक्रमाचे नियोजन करुन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणार आहेत.होऊ द्या चर्चा या अभियानामुळे नगर तालुक्यात ठाकरे सेनेचे भाजपला मोठे आव्हान असणार आहे.