जखणगाव येथे आरोग्य शिबीर

 जखणगांव येथील शिबिरात ३०० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

कै. डाँ. अनिल दिगंबर गंधे  यांच्या पुण्यतिथी निमित्त शिबीराचे आयोजन
कै. डाँ. अनिल दिगंबर गंधे  यांच्या पुण्यतिथी निमित्त 
आरोग्य ग्राम जखणगांव येथे गंधे हॉस्पिटल, ग्राम संसद आरोग्य ग्राम जखणगांव व डाँ.गरुड हॉस्पिटल सावेडी रोड  यांच्या संयुक्त विद्यमाने डाँ. गंधे हॉस्पिटलमध्ये मोफत डोळे (नेत्र)तपासणी  शिबिरात ३०० रूग्णांची मोफत तपासणी  तर ४५ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
डाँ.सौ अजिता शिंदे (गरूड )एमबीबीएस,एम एस 
प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक  अहमदनगर यांनी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सर्व रूग्णांची मोफत तपासणी केली . यात मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टी कमी असणे, तिरळेपणा,डोळ्यात मांस वाढणे,डोळ्यात पडदा असणे,डोळे लाल होणे,डोळ्यात जखम असणे,
डोळ्याचा चष्म्याचा नंबर कॉम्प्युटर च्या सहायाने तपासणे ई. सर्व डोळ्याचे आजारांवर सर्व रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
४५ रुग्णा़ना ऑपरेशन ची गरज असल्याने अशा पेशंटला सवलती च्या दरात नगर येथे ऑपरेशन केले जातील.या शिबिरात अद्यावत मशीन च्या सहायाने डोळ्याच्या नंबर ची मोफत तपासणी करून १०० रूग्णांना अत्यल्प दरात चष्मे देण्यात आले.
प्रसिद्ध पर्यावरण अधिकारी कै डाँ. हेरंबप्रसाद उर्फ अनिल दिगंबर गंधे यांच्या पुण्यतिथी निमित्त
गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत गंधे हॉस्पिटल,आरोग्य ग्राम जखणगांव ता नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी जखणगांव चे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांचे सह अशोक ढगे,बाळासाहेब खेडकर,राजेंद्र भीसे,ओंकार सोनवणे, वर्षा केदार,डाँ. पद्मजा गरूड यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *