नगर तालुक्यातील या गावात रंगला खेळ पैठणीचा
विजेत्या महिलांना फ्रिज, टिव्ही, कुकर तसेच पैठणीचे केले वाटप
अहमदनगर – गणेशउस्तवामध्ये खंडाळा युवा प्रतिष्ठान नी महीलासाठी आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम चांगलाच रंगतदार झाला.
खंडाळा ( ता. नगर ) येथील युवा प्रतिष्ठाननी महिलांसाठी दहा दिवस वेगवेगळे उपक्रमाचे आयोजन केले होते. गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळासाठी गावामधून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या खेळात विजयी झालेल्या तीन महिलांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये
प्रतीक्षा गायकवाड -फ्रिज) , कल्याणी दळवी -एलईडीटिव्ही, रोहिणी लोटके -मिक्सर & कुकर. उपस्थित प्रेक्षक महिलांमधून तीस महिलांना पैठनी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथमच अश्या प्रकारचा कार्यक्रम झाल्यामुळे महिलानी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
यावेळ विखे म्हणाले ग्रामीण भागातील महिलांना दिवसभर शेतीचे कामे , घर घरातील कामात व्यस्त असतात. गणेश उत्सवानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम मधून महिलांना एकत्र आणले. वेगळाच आंनद महिलांना दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानले. अश्या प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक गावात झाले पाहिजे. नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत सुजाता कार्ले यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्वल त्यांचा सत्कार करण्यात आला.
. या कार्यकत्म कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, विकास कार्ले, राहुल लोटके, श्रीकांत कार्ले, माजी सरपंच अनिल लोटके शुभम टेकाडे,विनोद गव्हाणे यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील माहिला व तरुण मंडळानी प्रयत्न केले..कार्यक्रमाचे राजश्री लोटके यांनी मानले या कार्यक्रमासाठी खासदार डॉ, सुजय विखे पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, सरपंच सुजाता कार्ले, शरद बोठे उपस्थित होते.