केडगावच्या पाणी प्रश्नाचे शिल्पकार श्री भानुदास कोतकर व माजी महापौर संदिप दादा कोतकरकोतकर कुटुंबाच्या नेतृत्वाखाली प्रभाग १६ मध्ये अपक्ष उमेदवारांना वाढता पाठिंबा

केडगावच्या पाणी प्रश्नाचे शिल्पकार श्री भानुदास कोतकर व माजी महापौर संदिप दादा कोतकर
कोतकर कुटुंबाच्या नेतृत्वाखाली प्रभाग १६ मध्ये अपक्ष उमेदवारांना वाढता पाठिंबा
अहिल्यानगर – केडगावच्या विकासाच्या इतिहासात पाणी प्रश्नावर निर्णायक व कायमस्वरूपी तोडगा काढणारी नेतृत्वाची जोडी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर आणि माजी महापौर संदीप दादा कोतकर (पिता–पुत्र) होय. केडगावकरांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर ठोस उपाययोजना करत या पिता–पुत्रांनी केडगावकरांची तहान भागवली, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही.
पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या केडगावला नियमित व विश्वासार्ह पाणीपुरवठा उपलब्ध करून देत, विकास म्हणजे केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृती असते, हे कोतकर पिता–पुत्रांनी सिद्ध करून दाखवले. त्यामुळेच आजही केडगावकरांच्या मनात त्यांच्या कार्याबद्दल विश्वास, आदर आणि कृतज्ञता आहे.
सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भानुदास कोतकर व त्यांचे पुत्र संदीप दादा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सागर सातपुते, भूषण गुंड, सविता कराळे आणि विमल कांबळे हे अपक्ष उमेदवार महानगरपालिका प्रभाग १६ मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
केडगावकरांना २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा संकल्प, तसेच रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत नागरी सुविधांचा सर्वांगीण विकासाचा आराखडा या उमेदवारांकडे असल्याने, नागरिक त्यांच्याकडे आशेचा नवा किरण म्हणून पाहत आहेत.
“ज्यांनी पाणी दिलं, तेच केडगावचा विकास घडवतील,” अशी ठाम भावना आज प्रभाग क्रमांक १६ मधील मतदारांमध्ये दिसून येत असून, कोतकर पिता–पुत्रांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनावर विश्वास ठेवून अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
केडगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभव, कामाची शिदोरी आणि विकासाची दृष्टी असलेले हेच नेतृत्व योग्य असल्याचा सूर आता सर्वसामान्य नागरिकांतून उमटू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *