नेप्ती सेवा संस्थेचे अध्यक्षपदी सुरेंद्र होळकर उपाध्यक्षपदी सादिक पवार

नेप्ती सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेंद्र होळकर उपाध्यक्षपदी सादिक पवार

आहिल्यानगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेंद्र रावसाहेब होळकर तर उपाध्यक्षपदी सादिक नथू पवार याची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी मंदाकिनी ठोकळ, सचिव राजेंद्र खुंटाळे यानी दिली.
नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष , उपाध्यक्ष पदाची निवड मंगळवार दि. ८ रोजी संस्थेच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी एक एक अर्ज आल्याने हि निवड बिनाविरोध झाली. माजी सरपंच विठ्ठल जपकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड झाली. यावेळी माजी अध्यक्ष विलास जपकर, राजाराम जपकर, राजेंद्र जपकर,माच्छिंद्र होळकर, मुक्ता कांडेकर, अशोक जपकर, सुरेश कदम, जालींदर शिंदे, अंबादास जपकर, उमर सय्यद, राजू जपकर, मल्हारी कांडेकर, रोहीणी होळकर हे संचालक उपस्थित होते. प्रत्येक वर्षा नवीन अध्यक्ष , उपाध्यक्ष ची निवड करण्याबाबत सर्व संचालकाचे एकमत झाल्यामुळे आज या नवीन संचालकाना संधी देण्यात आली. यावेळी होळकर म्हणाले सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. यावेळी सरपंच संजय अशोक जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, संजय आसाराम जपकर, सौरभ जपकर, वसंत पवार, संभाजी गडाख, दादू चौगुले, देवा होले, फारुक सय्यद, रामदास फुले, हर्षद तांबे, बहिरू जपकर, भूषण पवार,प्रसाद पवार, रवी होळकर, अविनाश होळकर, बाबा होळकर, बंडू जपकर, अतुल जपकर, भास्कर जपकर, अंबादास जपकर, अशोक होळकर, ज्ञानेश्वर जपकर, उत्तम फुले, अतुल गवारे,वंसत कदम ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *