प्रा.शिवाजी घाडगे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर -रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे प्रा. शिवाजी घाडगे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला
अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे आज दि. २९ रोजीआयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रदान करण्यात आला. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे, आमदार संग्राम भैया जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, संपतराव सूर्यवंशी ( शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य) राजेंद्र अहिरे (शिक्षण उपसंचालक पुणे विभाग)
यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
शिवाजीराव घाडगे हे रामराव चव्हाण विद्यालय नागापूर एमआयडीसी येथे कार्यरत असून त्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्याबद्दल तसेच शालेय व्यवस्थापन सहशालेय उपक्रम विविध स्पर्धा स्वच्छ व सुंदर शाळा, सोलर सिस्टिम ,डिजिटल क्लासरूम, उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी दरेकर, उपशिक्षणाधिकारी बुगे, मुख्याध्यापक संघाचे सुनील पंडित, शांताराम पोखरकर शहर मुख्याध्यापक संघाचे ज्ञानदेव बेरड शिक्षक परिषदेचे बाबा बोडखे बोडखे संभाजी पवार, हबीब शेख, राजू नरवडे, आसाराम आढाव, केशव गुंजाळ तसेच जिल्ह्यातील सर्व शाळातील मुख्याध्यापक उपस्थित होते.