शपथविधी सोहळ्याला पद्मश्री पोपटराव पवार यांना विशेष निमंत्रण
हिवरे बाजार : प्रतिनिधी
राज्यातील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.५ डिसेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्राणानुसार उपस्थित होते. श्रीरामांची मूर्ती घडविताना मूर्तीचे काही तुकडे निवडक ३०० भाग्यवंताना पाठविण्यात आले त्याचा एक तुकडा शिलांश हिवरे बाजारला मिळाला आणि त्याचा उत्सव ग्रामस्थांनी शिलाश स्थापनेनिमित्ताने दिनांक १६ ते २३ एप्रिल २०२४ कालावधीत मोठा श्रीराम कथा उत्सव धुमधडाक्यात केला.पद्मश्री पोपटराव पवार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.