भाऊसाहेब रोहकले यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त
नगर-नगर तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब अंबादास रोहकले यांना अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाद्वारे सन 2023 चा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्याचे शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी यांच्या हस्ते नाशिक विभाग विधान परिषदेचे शिक्षक आमदार किशोर दराडे, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे व जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील पंडित यांच्या उपस्थित देण्यात आला.
भाऊसाहेब रोहकले 32 वर्षापासून ज्ञानदीप विद्यालय वाळुंज चे मुख्याध्यापक असून नगर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. वाळुंज तालुका नगर येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या व्यवस्थापन संस्था श्री .स्वामी विवेकानंद ग्राम विकास संस्थेचे संस्थापक सचिव असून संस्थेचे उभारणीत संचालक मंडळ, ग्रामस्थ देणगीदार यांच्यासह त्यांचा मोलाचा सहभाग आहे. लोकसहभागातून सुमारे ५० लक्ष रुपयांची विद्यालय इमारत उभारून महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी ५लक्ष रुपयांचा विद्यार्थी कल्याण निधी उभारणे सेमी इंग्लिश माध्यमातून सलग १० वर्षे एस .एस .सी .चा निकाल १०० टक्के केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ विद्यालय ५ स्टार मानांकन मिळविणे इत्यादी अनेक यशाचे ते शिल्पकार आहेत. याबरोबरच वाळुंज गावच्या सामाजिक आरोग्य धार्मिक कार्यातही त्यांचे बहुमूल्य योगदान असते. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन यापूर्वीही इंडियन बहुजन टीचर असोसिएशनचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा संत ज्ञानेश्वर गुणवंत शिक्षक पुरस्कार, शब्दगंध साहित्य परिषदेचा साने गुरुजी पुरस्काराने ते सन्मानित आहेत. श्री क्षेत्र पंढरपूर येथील भागवत धर्म प्रसारक मंडळाचे ते अजून संचालक असून वाळुंज येथील वाळुंज माता पायी दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापक आहेत.
गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. स्वामी विवेकानंद ग्राम विकास संस्थेचे पदाधिकारी ,ग्रामपंचायत, सेवा सोसायटी वाळूंज तसेच वाळुंज ग्रामस्थ, विद्यार्थी ,पालक शिक्षक वृंद यांच्याकडून भाऊसाहेब रोकडे यांचे अभिनंदन होत आहे.