रुईछत्तिशी येथे तालुकास्तरीय खो – खो स्पर्धांचे आयोजन , ५० ते ५५ संघ होणार सहभागी..
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे जनता विद्यालयात तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील जवळपास ५० ते ५५ संघ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.जनता विद्यालयात येथून मागे देखील अनेक वेळा खो – खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मागील चार वर्षापासून कोरोनाच्या काळात खो – खो व इतर क्रीडा स्पर्धा बंद करण्यात आल्या होत्या. शाळा नियमित सुरु झाल्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.तालुका स्तरीय खो – खो स्पर्गेत १४ वर्ष , १७ वर्ष , १९ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , जिल्हा क्रीडा परिषद , नगर तालुका क्रीडा समिती व जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.नगर तालुक्यातील येणारे सर्व संघ , क्रीडा शिक्षक , क्रीडा प्रशिक्षक यांना सर्व सोयी – सुविधा पुरवण्यात येणार आहेत.स्पर्धा मागील महिन्यात आयोजित करण्यात आल्या होत्या पण पावसाचे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.१२ , १३ , १४ ऑक्टोबर या तीन दिवसात ही स्पर्धा रंगणार आहे. शाळेचे प्राचार्य शिवाजी धामणे , पर्यवेक्षक दत्तात्रय नारळे , क्रीडा शिक्षक कैलास कोरके , भाऊसाहेब पवार , ताराबाई मुळे व इतर शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले आहेत. तालुक्यातील सर्व विद्यालयानी या सामन्यात सहभागी व्हावे असे अवाहन क्रिडा समिती चे अध्यक्ष महेंद्र हिंगे व दत्ता पाटील नारळे यांनी.केले.