बारादरी ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम.

 बारादरी ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम.

७ वी ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध
नगर -नगर तालुक्यातील बारादरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदास६ सहा जागा बिनविरोध निवडून आल्या.  ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे.
बारादरी ग्रामपंचायत मध्ये एक लोकनियुक्त सरपंच व सात जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सरपंच पद महिला राखीव असुन त्या जागेकरिता सुरेखा संजय पोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची सरपंच पदी निवड निश्चित झालेली आहे. तसेच सदस्य पदाकरिता नवनाथ बचन राठोड, द्वारका अर्जुन बड़े, मंदा बाबासाहेब पोट, शेख नौशादी रफिक, पुजा मुरलीधर पोटे, गणेश मिठु गर्जे, नितीन वचन वाघचौरे यांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत.
निवडणुक बिनविरोध झाल्याने गावाच्या विकासावर याचा चांगला परिणामा होणार आहे. निवडणुकीमुळे येणारी कटुता संपुष्टात येते व गावातील वातावरण खेळीमेळीचे व सौहादांचे राहते . गावामध्ये एकोपा राहतो व  गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. गेल्या तीस वर्षापासून प्रत्येकवेळी बादरी ग्रामपंचायतची निवडणुक बिनविरोध झालेली असून तोच पांयडा यावर्षी पाळण्यात गावकऱ्यांना यश आलेले आहे.
सदरची निवडणुक बिनविरोध होण्याकरिता आमचे बारदरी गावचे भूषण नगर तालुक्याचे माजी सभापती सुर्यभान पोटे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य युवराज भानुदास पोटे युवानेते सुधीर पोटे, भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष तुषारभाऊ पोटे, वि.का.से.सो चे चेअरमन रमेश राठोड  मा. सरपंच बबन पोटे, आसाराम पोटे, अशोक पोटे, गोकुळ तोरडमल, रामराव पोटे, मिठु पोटे, जाफरभाई शेख, अनिल पोटे सर, बाबासाहेब पोटे सर, सोमनाथ पोटे, राजेंद्र थोरात, सोन्याबापु पोटे, अर्जुन पोटे, गोरख चापचीर सर, उत्तम राठोड, सचिन जंगम, शिवाजी बडे, शिवाजी गर्ने, अर्जुन सानप, महादेव गर्जे, मन्सुर शेख, राहुल पोटे, ईश्वर पोटे, यश पोटे, शंकर गजे, गणेश पोटे, मधुकर चव्हाण, ओंकार जंगम आदिनी परिश्रम घेतले 
बिनविरोध निवडणुकीसाठी समस्य ग्रामस्थ बारादरी सर्व मान्यवरांचे युवानेते सुधीर भाऊ पोटे
यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *