माळवाडी चौकाचे नामकरण

 बाह्यवळण रस्त्यावरील माळवाडी परीसरातील चौकाला छत्रपति संभाजी महाराज चौक नामकरण 

अहमदनगर( ता. नगर ) येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात गेल्याने गावातील ग्रामस्थांनी माळवाडी परीसरातील या  सर्कलला छत्रपति संभाजी महाराज चौक असे नाव देऊन नामकरण केले.
 निंबळक सरपंच, ग्रामंपचायतच्या परवानगीने तसेच माळवाडी परीसरातील ग्रामस्थानी चौकाचे नामकरण करण्याचा  निर्णय घेतला. या चौकाचे नामकरण करण्याबाबत नॅशनल महामार्गाच्या अधिकाऱ्याची रितसर परवानगी घेतली .नगर तालुका पोलिस स्टेशनला कळविले आहे. नामकरण करण्यात आलेला चौक निंबळक माळवाडी हद्दीमध्ये आहे. या हद्दीमध्ये परीसरातील गावामधील नागरिकांनी अतिक्रमण करू नये असे अजय लामखडे यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी बाळासाहेब कोतकर, सुदाम कोतकर, मच्छिंद्र भोर, बाबासाहेब पगारे, अतिष कोतकर, शंकर पांनगे, किरण कोतकर, सचिन कोतकर, माधव रेपाळे, राजेंद्र कोतकर, संजय नारायण,  संजय भाऊसाहेब कोतकर , दिलीप होळकर, नवनाथ कोतकर, सागर कोतकर, दत्तात्रय कोतकर, दिपक भोर, भाऊसाहेब कोतकर, बंटी कोतकर, आकाश कोतकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *