रुईछत्तिशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत सर्व रोग निदान शिबिर…
ग्रामपंचायत व साईदिप हॉस्पीटल यांचा संयुक्त उपक्रम..
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ग्रामपंचायत व साईदिप हॉस्पीटल आणि हेल्थकेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत मोठ्या प्रमाणात आजारांचे प्रमाण वाढले असून त्यांची मोफत तपासणी करण्याचा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने जवळपास १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. साईदिप हॉस्पीटलचे सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने ही तपासणी करण्यात आल्याने शिबिरात योग्य मार्गदर्शन करण्यात आले. डायबिटीस , शुगर , मेंदूविकार , गुडघेदुखी , हृदयरोग , मूत्रपिंड विकार असे अनेक आजार वाढल्याने रुग्णांना या तपासण्या करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च येतो त्यामुळे सामान्य व्यक्तींना या सर्व आजारांची मोफत तपासणी करता यावी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष टाक यांचे विशेष सहकार्य मिळाले.निदान झालेल्या सर्व रुग्णांचे मोफत उपचार केले जाणार आहेत यावेळी नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र भापकर , व्हा. चेअरमन भरत भुजबळ , माजी चेअरमन राजकुमार गोरे , माजी सदस्य सोमनाथ कुटे , माजी चेअरमन एकनाथ गोरे , माजी सदस्य प्रमोद रासकर , सागर गोरे , संदीप गोरे व इतर ग्रामस्थ , आरोग्य कर्मचारी , पदाधिकारी उपस्थित होते.