जनता विद्यालयात तालुकास्तरीय खो – खो स्पर्धांचा दिमाखात प्रारंभ..
“पहिल्याच दिवशी ३४ संघांचा सहभाग…
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी येथील जनता विद्यालयात आज तालुकास्तरीय खो – खो स्पर्धांची दिमाखात सुरुवात करण्यात आली.तालुका क्रीडा समिती , क्रीडा परिषद व जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.माजी जिल्हा क्रीडाधिकारी सुधीर चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.मुलांनी आजकाल खेळाकडे लक्ष देऊन उत्तम आरोग्य जोपासले पाहिजे असे मत चपळगावकर यांनी तर खेळा , आनंद घ्या व उत्तम आयुष्य जगा असा संदेश माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी दिला. क्रीडा सामने आयोजित करून विद्यालयाची मान कायम उंच राहिली आहे असे मत रमेश भांबरे यांनी व्यक्त केले.पहिल्याच दिवशी नगर तालुक्यातील ३४ संघांनी सहभाग घेतला होता.तालुक्यातील सर्वच संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने स्पर्धा रंगतदार होणार आहे.कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे , प्राचार्य शिवाजी धामणे , पर्यवेक्षक दत्तात्रय नारळे , रमेश भांबरे , रवींद्र भापकर , भरत भुजबळ , धनंजय खाकाळ , प्रविण गोरे , मिलिंद गोरे , राजेंद्र कोतकर , संजय रक्ताटे , भरत थोरात , विकास हिवाळे , हरिओम मिसाळ , कैलास कोरके , सौ. ताराबाई मुळे , भाऊ पवार , महेश शेळके , अशोक कळसे , अक्षय यादव , सोनू पराडे , विशाल दुकळे , राहुल ठाणगे , रियाज शेख , गणेश वारुळे , प्रताप बांडे , राजन असलकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब महारनवर , अध्यक्षीय निवड संजय कोतकर तर अनुमोदन दिनकर मुळे यांनी केले.