अशोकराव कडूस शिक्षणाधिकारी
शालेय जीवनात एक चूक संधीपासून वंचित ठेवू शकते –
अशोकराव कडूस शिक्षणाधिकारी
आहिल्यानगर –
विद्यार्थ्यांनो जीवनात सकारात्मक विचार करा, आपल्यांतील कौशल्य शोधा, त्याग करा, यश तुमच्या मागे धावेल. शालेय जीवनात कौशल्य ओळखून यश संपादन करण्यास सांगितले. तसेच इयत्ता दहावीच्या मुलांना कॉपीमुक्तीची शपथ दिली शालेय जीवनात एक चूक संधीपासून वंचित ठेवू शकते असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले. सचिन धस यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी शोधा असा उपदेश केला.
आदर्शगाव हिवरेबाजार येथील यशवंत माध्यमिक विदयालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रसगीते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. पोपटरावजी पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस, तर प्रमुख मार्गदर्शक महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन धस, मराठी अभिनेत्री राजश्री लांडगे हे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक मुरलीधर अमृते यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला सचिन धस यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी शोधा असा उपदेश केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पदमश्री डॉ.पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितके महत्त्व देता तितकेच महत्त्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिले पाहिजे. शाळेने तुम्हाला जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे. त्या शिदोरीचा तुम्ही उपयोग करून जीवनात यश प्राप्त केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वत:चे तसेच शाळेचे गावाचे देशाचे नाव व आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त, संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी सरपंच विमलत ठाणगे म्हणाल्या ज्यांना ज्या क्षेत्रात ज्यायचे आहे, ज्या क्षेत्रात करियर करायचे आहे ते आधीच निश्चित करणे गरजेचे असते. ध्येयहीन जीवन जगायचे नाही. ध्येयावर लक्ष ठेवून ध्येयप्राप्तीसाठी धडपड करावी. गाडी व मोबाईलचा अतिरेक न करता दहावी नंतर फक्त पाच ते सहा वर्ष आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी चांगला अभ्यास करा. यावेळी पिंपळगाव वाघाच्या सरपंच सुलोचना नाट, भोयरे खुर्दचे सरपंच राजूशेठ आंबेकर, चेअरमन छबुराव ठाणगे, हरीभाऊ ठाणगे, एस.टी.पादीर, बाबासाहेब गुंजाळ, वसंतराव कर्डीले, सहदेव पवार, रो.ना. पादीर, पालक, ग्रामस्थ शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


