सभासदांना 12% डिव्हीडंट वाटप करणार – अध्यक्ष महादेव खडके .

सभासदांना 12% डिव्हीडंट वाटप करणार – अध्यक्ष महादेव खडके .
चिचोंडी पाटील  सेवा संस्थेची सभा  खेळीमेळीत 
चिंचोडी पाटील – चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
चिचोंडी पाटील सेवा सह.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच लिलाई मंगल कार्यालय येथे पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे अध्यक्ष  महादेव खडके होते.प्रास्ताविक संचालक संदीप कोकाटे यांनी केले.
मागील वर्षी संस्थेचे एकूण कर्ज वाटप १६,५५,६३,७५० इतके झाले  संस्थेत एकूण नफा १५,९०,७६८  इतका झाला.जुनी असलेली थकबाकी व कर्ज वसुलीसाठी सर्व संचालक मंडळांनी मदत केल्याबद्दल व अत्यंत काटकसरीने कारभार केल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला.
जिल्हा बँकेकडून एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध नसताना प्रत्येक सभासदाकडून एटीएम कार्डसाठी बँकेने जी कपात केली त्याबद्दल अनेक सभासदांनी खेद व्यक्त केला.यावर संस्थेने योग्य तो पाठपुरावा करून सभासदांना बँकेकडून न्याय देण्याचे सांगितले. 
येणाऱ्या काळात कर्जदार सभासदाचा अपघात विमा उतरवणे, संस्थेचे स्वतःच्या मालकीचे भव्य व्यापारी संकुल उभारणे, संस्थेचे आर्थिक स्तोत्र वाढवण्यासाठी सीएनजी गॅस पंप तसेच सेतू कार्यालय संस्थेच्या वतीने चालविणे असे महत्त्वाचे निर्णय बहुमताने घेण्यात आले. सर्व सभासदांना 12% डिव्हीडंट वाटप देण्याचे चेअरमन महादेव खडके यांनी जाहीर केले
*गेल्या आर्थिक वर्षात सर्व संचालक मंडळाने अतिशय पारदर्शक कारभार करून संस्थेचे हित जोपासल्याचे प्रतिपादन सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी केले व काही तृटी सुधारण्याचे सुचविले*
सभेसाठी शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर,सरपंच शरद पवार,संभाजी ब्रिगेड्चे राजेश परकाळे,मा.पं.स.सदस्य सुधीर भद्रे,आप्पासाहेब पवार,मा.सरपंच मच्छिंद्र खडके,अण्णासाहेब कोकाटे, डॉ.ययाती फिसके,अरुण दवणे,अशोक कोकाटे,राजेंद्र कोकाटे, पांडुरंग ससे,दिलीप पवार,अंबादास फिसके,अर्जुन वाडेकर,पंडित कोकाटे,विठ्ठल कोकाटे,काशिनाथ वाडेकर,महेश जगताप,चंद्रकांत सदाफुले,कासमशेठ सय्यद, काशिनाथ बेल्हेकर,बबन कोकाटे,पंडित भद्रे,राम ठोंबरे यांसह अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मारुती ससे यांनी केले.अहवाल वाचन सचिव श्री दत्तात्रय झांबरे यांनी केले तर आभार संस्थेचे व्हा.चेअरमन सुरेश ठोंबरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *