कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
समाजाच्या व देशाच्या जडणघडणीत मुली व महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. -भाग्यश्री पाटील
निंबळक – मुलींनी दैनंदिन जीवनात कोणती काळजी घ्यायची, शिक्षणाबरोबरच स्वतः करिअर घडवताना सामाजिक सुरक्षेबद्दल आपण कोणती सतर्कता बाळगावी. समाजाच्या व देशाच्या जडणघडणीत मुली व महिलांचा असणारा सहभाग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधिश भाग्यश्री पाटील यांनी केले
नागापूर एमआयडीसी येथील रेणुका शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या रामराव चव्हाण विद्यालयात आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर, अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशन व रामराव चव्हाण विद्यालय नागापूर यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती
कार्यक्रमात बोलत होत्या.
विद्यालयाचे आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक शिवाजीराव घाडगे यांनी विद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. अॅड राजाभाऊ शिर्के यांनी सगणंक तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची, सायबर गुन्हे व त्यापासून आपण कसे दूर राहायचे याविषयी मार्गदर्शन केले. अॅड सुनील मुंदडा यांनी विश्वास, जिद्द व अभ्यासातील सातत्य आणि माहिती तंत्रज्ञानातून स्वतःला परिपूर्ण कसे ठेवायचे या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुलींनीही भाग्यश्री काळे यांच्याशी संवाद साधला.या कार्यक्रमास अॅड. संजय पाटील, अॅड.सतीश पाटील, अॅड. किशोर देशपांडे, अॅड.भूषण बऱ्हाटे, अॅड.अभय राजे, अॅड.अनिल सरोदे, अॅड.राजेश कावरे. अॅड ज्ञानेश्वर दाते, संस्था अध्यक्ष भिमाजी कोकणे, उपाध्यक्ष कृषी भूषण सूरसिंगराव पवार, संस्थेच्या संचालिका सुनंदा घाडगे, महानंदा पवार , सचिव ज्ञानेश चव्हाण,सहसचिव नितीन घाडगे,पर्यवेक्षक दत्तात्रय दरेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू नरोडे आभार सुरसिंग पवार यांनी मानले