महसूल भवनाचे शनिवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन*

 महसूल भवनाचे शनिवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन*

अहमदनगर (प्रतिनिधी)
राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर येथे महसूल भवन इमारतीच्या भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा   बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे उपस्थित राहणार असून 
आ.बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, आ. प्रा.राम शिंदे, आ.संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
४७.८६ कोटी रुपये खर्च करून हे महसूल भवन बांधण्यात येणार असून अहमदनगर जिल्ह्यासाठी हे भवन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अहमदनगर तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी दुपारी तीन वाजता, तहसील ऑफिस जवळ टीव्ही सेंटर परिसर अहमदनगर येथे होणार आहे 
या महसूल भवन इमारतीच्या भूमिपूजन समारंभास महायुतीचे जेष्ठ नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकाभव्य समारंभाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *