सारोळा कासार येथे शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी
नगर- सारोळा कासार ( ता. नगर ) येथे रवी भाऊ कडूस मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्साहाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नऊ दिवस सामाजीक, धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे रविंद्र कडूस यांनी सांगीतले.
सलग नऊ वर्षापासून सारोळा कासार येथेनवरात्र उत्सव साजरा केला जातो. सलग नऊ दिवस विविध सांस्कृतिक कलाक्षेत्राची निगडित कार्यक्रम साजरे केले जातात. यावर्षी सुद्धा रविवारी घटस्थापनेच्या दिवशी देवीची वाजत गाजत मिरवणुक काढणार आहे. सोमवारी भारुड सम्राट इंदापूरकर ह. भ. प. सावता फुले यांचा भारुडाचा कार्यक्रम, १७ तारखेला हास्य सम्राट डॉक्टर संजय कळमकर यांचा प्रबोधनपर कार्यक्रम, १८ तारखेला संस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बालगट ते खुला गट सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी १९ ला सोनू साठे यांचा जागर देवीचा कार्यक्रम, शुक्रवारी २० ला सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प.इंदुरीकर महाराज यांचा प्रबोधक पर किर्तन, रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया,रविवारी २१ ला हर्षवर्धन पारदे मुंबई करनिर्मित महाराष्ट्राची लोकधारा, २२ अनिल जाधव यांचा चारोळ्या चा कार्यक्रम, सोमवारी २३ ला उध्दव काळा पहाड महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम अशा प्रकारचा बहुरंगी कार्यक्रम. नऊ दिवस साजरे होणार आहे. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच आरती रवींद्र कडूस तसेच घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष रवींद्र कडूस आवरात्र प्रयत्न करीत आहे. सलग नऊ वर्षापासून सिनेस्टार रामनगरकर तसेच प्रसिद्ध साहित्यिक कवी मुबारक तांबोळी यांच्या संकल्पनेतून रवींद्र कडूस मित्र मंडळ सारोळा कासार यांच्यावतीने साजरे होत आहेत.कार्यक्रमासाठी शिवाजी कडूस, बाळासाहेब गट,आयुष्य मैड, गंगाधर धामोरे, नानासाहेब पारदे,सतीश गट, सुनील गट, लतीफ शेख, सुरेश महाराज, भूषण कडू, सतीश मेजर, बब्बू मेजर, मम्माबाई, उत्तम पैलवान, दत्ता महाराज, तुकाराम ढोरे, दत्ता धामणे, विठ्ठल काळे, विठ्ठल कडूस, दत्ता लिंबोरे, दिलीप नागरे,जयसिंग कडूस ,गणेश पाटील, डॉक्टर श्रीकांत देशपांडे, संदीप काळे, जगन्नाथ डोरसकर, ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक निवृत्त पोलीस निरिक्षक पोपटराव कडू, शिक्षण अधिकारी अशोकराव कडूस, उद्योजक केशव काळे ,जिल्हा बँक माजी व्यवस्थापक विलासराव कडूस, चेअरमन संजय कडूस, माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे, उद्योजक राजू मैड या सर्व सारोळा कासार च्या भूमिपुत्रांचे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाचीधुरा श् शहाजहान तांबोळी सर तसेच श्री रमेश काळे सर हे पार पाडणार आहेत