विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सरपंचाचा वाढदिवस साजरा
नगर -नांदगाव ता. जि. अहमदनगर लोकनियुक्त सरपंच सखारामा आण्णा सरक यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम शिबिरांचे उद्घाटन माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कर्डिले यांनी सरपंच सखाराम अण्णा सरक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये नांदगावला पंचायत समितीचे उमेदवारी मिळणार अशा शुभेच्छा सरपंच यांना सर्व ग्रामस्थांनी दिले आहेत.
अहमदनगर ब्लड बँक च्या वतीने रक्तदान शिबिरात 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले, बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने मोतिबिंदू व नेत्र तपासणी शिबीरात 80 रुग्ण तपासले असून 15 रूग्णांना मोती बिंदू ऑपरेशन साठी बोलावलं आहे,
साईधाम हॉस्पिटल राहुरी डॉ .माने स्त्रीरोग यांच्या वतीने महिलांची विविध आजाराच्या तपासणी करून 105 रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात
आला. काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात बोलावून गरज पडल्यास अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल असे डॉक्टर माने यांनी सांगितले.
60 लाभार्थ्यांनी आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती करून घेतली,50 लाभार्थ्यांनी आभा कार्ड नोंदणी 45 लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढले
मिशन आपुलकी अंतर्गत शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले
आपण राजकीय लोकांचे वाढदिवस बघितले डीजे फटाके ढोल ताशे ,बॅनर बाजी अशा अनेक गोष्टी केल्या जातात परंतु नांदगावचे सरपंच सखाराम अण्णा सरक यांनी या सर्व गोष्टीला फाटा देऊ सामाजिक उपक्रम च्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला आहे
याप्रसंगी माजी मंत्री कर्डिले मार्केट कमिटीचे उपसभापती रभाजी सुळ ,मा संचालक वसंतराव सोनवणे ,तंटामुक्ती अध्यक्ष शामराव सोनवणे ग्रामपंचायत मा.सरपंच सुनिता सरक उपसरपंच इंजि. नाथाभाऊ सरक माजी उपसरपंच रूपाली वाघमारे ग्रामपंचायत सदस्य मीराबाई कोळेकर राधिका धनवटे सुवर्णा वर्पे मिताबाई तांबे, उज्जैन चौगुले बाबासाहेब सोनवणे एकनाथ कोळपे आणि सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव सदस्या आणि सीआरपी निर्मला केदारी तसेच मोठ्या प्रमाणात महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.