हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संपत पंडित 

हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी संपत पंडित 

उपाध्यक्षपदी संदीप साळवे, सचिवपदी संतोष राहिंज

नगर दि.11- आरोग्य क्षेत्रात अग्रणीय व महाराष्ट्र पातळीवर कामकारणारी एकमेव संगठना हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन अहिल्यानगर च्या जिल्हाध्यक्षपदी संपत पंडित यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी संदीप साळवे, सचिवपदी संतोष राहिंज, सहसचिवपदी सौरभ वैरागर आणि खजिनदारपदी इरफान शेख सहखजिनदार – सुरज काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड 2025 आणि 2026 या एक वर्षाकरिता करण्यात आलेली आहे. पुणे येथील कार्यालयात संघटनेच्या सभासदांची बैठक पार पडली . येणाऱ्या वर्षात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  धनंजय कणसे,सुजाता नाईक, जितेंद्र धापसे,  मानसिंह चव्हाण, महेंद्र नाईकवाडे तसेच पुणे व छत्रपती संभाजी नगर विभागातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले  तसेच सभासदांचा सत्कार करण्यात आला. नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष- संपत पंडित, उपाध्यक्ष- संदीप साळवे, सचिव- संतोष राहिंज, सहसचिव- सौरभ वैरागर, खजिनदार- इरफान शेख  सह खजिनदार – सुरज काटकर ,किशोर पोखरणा , राजेश पंडित , सुनिल भिसे , श्रीमंत भालेराव , रणजीत घाडगे , अजय गांधी, सोमनाथ वाघ , संतोष शेळके , गणेश अरगडे, अविनाश कुटे,राजू होळकर, सरफराज शेख, वढावकर , गणेश आरगडे , राहुल घोलप हरीश आल्हाट,बिलालसर ,महेश मोरे , अमोल फुंदे ,राज गांधी ,सुनिल माहनोर, मनोज भुजाडी व इतर सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *