हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला
रॅलीद्वारे स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संदेश
आजारांना दूर ठेवण्यासाठी पर्यावरण रक्षण व स्वच्छता महत्वाची
-प्राचार्य अशोक बेरड
नगर – वडगाव गुप्ता येथील नामांकित त्रावणकोर एज्युकेशन ट्रस्ट संचलित हार्मनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तपोवन रोड परिसरातून रॅली काढून स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. याप्रसंगी प्राचार्य अशोक बेरड, शिक्षिका प्रितिका दहिफळे, अमोल ठोंबे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य अशोक बेरड म्हणाले, मुलांना लहानपणापासून स्वच्छतेची सवय लागली पाहिजे. यासाठी आपण स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता हा प्रत्येकाचा स्थायीभाव बनला पाहिजे. अस्वच्छता हे अनेक आराजांचे उगमस्थान असल्याने आजारांना दूर ठेवण्यासाठी आपण घर, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून, प्रत्येकाने वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे. विद्यालयाच्यावतीने एक विद्यार्थी एक झाड उपक्रम राबविण्यात येत आहे. आज विद्यार्थ्यांनी परिसरातून रॅली काढून स्वच्छता व पर्यावरणा विषयी जनजागृती केली. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांनाही स्वच्छतेची सवल लागेल, असे सांगितले.
या रॅलीत विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील सहभागी झाले होते. यामधून लोकांना स्वच्छतेचा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वच्छता व पर्यावरण पूरक संदेश लिहिलेले पोस्टर बनवले होते. रॅलीमध्ये सेव्ह वॉटर… सेव्ह अर्थ…, जन जन का नारा है… भारत को स्वच्छ बनाना है.., हर रोग पे एक दवाई.. घर घर मे रखो सफाई…, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक