राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श सरपंच व ग्रामसेवक पुरस्कार

 नगर – जखणगांव येथील सरपंच डॉ. सुनिल गंधे यांना राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श सरपंच  तर ग्रामसेवक प्रविण पानसंबळ यांना २०२३चा राजश्री शाहु आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रदान

जखणगांव ता नगर येथे चालू असलेल्या आरोग्यदायी ग्राम उपक्रमाची दखल घेऊन दक्ष मराठी पत्रकार संघ पुणे व राष्ट्रीय शोध संस्थेच्या वतीने दिला गेलेला छत्रपती राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनिल गंधे यांना व याच कार्यात केलेल्या भरीव कार्याबद्दल ग्रामसेवक श्री प्रविण पानसंबळ देण्यात आला
पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे सन्मानपुर्वक वितरण करण्यात आले
या कार्यक्रमास बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे,दक्ष मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव श्रीमंदीलकर,सरपंच संघटनेचे बाबासाहेब पावसे  उपस्थित होते
यावेळी  डाँ. सुनिल गंधे म्हणाले आरोग्यग्राम संकल्पनेतून जखणगांव मध्ये चालू असलेले कार्य हे जगातील अद्वितीय कार्य असुन याची जबाबदारी सर्व ग्रामस्थ उचलत आहेत .ग्रामविकास ही सामुहिक जबाबदारी असुन यात सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांच्या पेक्षा सेवा सोसायटी, बचत गट ,तरूण मंडळे,आशा,अंगणवाडी सेविका,शिक्षक,पतसंस्था, सेवाभावी संस्था व समस्त ग्रामस्थ यांचे योगदान फार महत्वाचे आहे.
हा पुरस्कार म्हणजे आमचा नसुन संपूर्ण ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा सन्मान आहे.आम्हाला करत असलेल्या सहकार्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थांचे सदैव रूणी राहु.
जखणगांव या एकमेव गावातील सरपंच व ग्रामसेवकाना या कार्यक्रमात एकाच वेळी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डाँ. सुनिल गंधे व प्रविण पानसंबळ यांचे सर्व स्तरातील नागरिकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *