देवगावच्या सरपंच राणी शिंदे, उपसरपंच आशा शिंदे यांचा सत्कार
पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळते
– माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले
नगर -ग्रामीण भागात काम करतांना सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधून त्याची मने जिंकता आली पाहिजे. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी झाले पाहिजे. महिला आरक्षण असल्यामुळे सरपंचपद ते मंत्रीपदापर्यंत माता -भगिनी कार्यरत होत आहेत. पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळते. त्या संधीचे सोने करा, असे प्रतिपादन माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी.राणी रमेश शिंदे यांची तर उपसरपंचपदी आशा अर्जुन शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे, माजी सरपंच संभाजी वामन, उपसरपंच हरिदास खळे, सेवा संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र शिंदे, सदस्य अशोक शिंदे, प्रकाश शिंदे, अर्जुन शिंदे, सुभाष शिंदे, राजेंद्र वामन, विजय शिंदे, बी.टी भाऊसाहेब आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कर्डिले म्हणाले, महिला सरपंचांनी गावचा कारभार सांभाळतांना चांगली कामे करा. गावच्या विकासासाठी केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजना असतात, त्याचा अभ्यास करावा, त्याचा लाभ गावाला मिळवून द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रामविकासाच्या विविध योजना आहेत. त्या यशस्वीपणे राबवाव्यात आपल्या कामांमधून गावाची व तुमची ओळख निर्माण करा, असे सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना सरपंच.राणी शिंदे म्हणाल्या, देवगाव हा भाग डोंगराळ असला तरी विविध योजनांच्या माध्यमातून गावाचा विकास होत आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी सभापती विलास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावात शासकिय योजना राबवून त्याचा लाभ ग्रामस्थांना कसा करुन देता येईल तसेच माझ्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग चांगल्याप्रकारे करुन देवगाव च्या विकासासाठी सदैव प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली.
शेवटी विलास शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.