_महाराष्ट्रातील पहिल्या चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीने महिला सुरक्षेचे दृष्टिकोनातून घेतला पुढाकार,_*
*_चिचोंडी पाटील गावातील युवती, महिलांना सॉस ॲपच्या माध्यमातून राहतील सुरक्षित – सरपंच शरद पवार,_*
*_चिचोंडी पाटील गावामध्ये पुन्हा कुठलेही गैरकृत्य घडणार नाही याची घेणार ग्रामपंचायत दक्षता._*
नगर-गेल्या दोन महिन्यांपूर्वी चिचोंडी पाटील गावामध्ये अतिशय निंदनीय घटना घडली होती. अंगणवाडी सेविका शहीद उमाताई महेश पवार यांच्यावर जो अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली. याच घटनेचा सर्व गावकऱ्यांनी निषेध केला परंतु त्यानंतर महिला सुरक्षेसाठी चिचोंडी पाटील ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन महाराष्ट्र मध्ये पहिल्याच ग्रामपंचायत म्हणून शहीद उमाताई पवार महिला सुरक्षा निडली सॉस ॲपचा माध्यमातून चिचोंडी पाटील मधील सर्व युवती महिला हे सुरक्षित राहतील व पुन्हा अशी घटना घडू नये याची देखील ग्रामपंचायत पूर्णपणे दक्षता घेईल.
आज महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आणि संवदेनशील बनला आहे. आपल्या घरातील तसेच परिसरातील मुली,महिला सुरक्षित राहणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.या भावनेतून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज माझ्या संकल्पनेतून लाडक्या बहिणी व जेष्ठ नागरिकांसाठी निडली सॉस हे अत्यंत प्रभावी असे मोबाइल अॅप्लिकेशन चिचोंडी पाटील गावातील महिला,जेष्ठ नागरिक व वाड्या वस्ती मधील मुली यांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. हे मोबाईल अॅप वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून इतर अप्लिकेशन सारखे त्याचा वापर महिला मुली सहज करून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतील असे प्रतिपादन सरपंच शरद पवार यांनी केले.
चिचोंडी पाटील येथे नीडली सॉस या ॲप्लीकेशन चे उद्घाटन सरपंच शरदभाऊ पवार, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीणदादा कोकाटे,उपसरपंच यशोदाताई कोकाटे,यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा ठोंबरे,संदीप काळे,वैभव कोकाटे, रिताताई कांबळे, महादेव खडके,अजय कांकरिया,प्रकाश कांबळे,जयश्री कोकाटे,अर्जुन कोकाटे, दिलीप पवार, बबन कोकाटे,रावसाहेब कोकाटे,युवराज देवकर,देविदास पवार, कल्याण जगताप, नामदेव थोरे,खंडू पवार, शंकर कोकाटे व ज्येष्ठ नागरिक संघ सर्व अंगणवाडी सेविका,जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षिका तसेच साई टेक्नो सर्विसेस चे अजित रोकडे, तुषार वानखेडे चिन्मय साबळे,चिचोंडी पाटील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
शरद पवार पुढे म्हणाले ज्या वेळेस मुली,महिला यांना असुरक्षिततेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाली तर मोबाइल मधील निडली सॉस या अॅप चा वापर केल्यास त्वरित जवळच्या चार नातेवाईक किंवा वरिष्ठ यांना सदर महिला असुरक्षित असल्याबाबतचा SMS आपोआप पाठविला जातो तसेच सदर मुलीचे लाईव्ह लोकेशन सुद्धा जाते आणि ते लोकेशन ट्रॅक करून त्या संकटग्रस्त मुली पर्यंत पोहोचता येते. तसेच तिच्या मोबाइल मध्ये आपत्कालीन सायरन वाजू लागतो, त्यामुळे समोरील व्यक्तीला गोंधळात पाडता येते.
तसेच मोबाइल ॲप्लिकेशन मधून आजूबाजूचा व्हिडिओ रेकॉर्ड करता येणे शक्य होते. त्याचबरोबर सदर अॅपचा वापर करून सुरक्षेसाठी उपलब्ध असणाऱ्या शासनाच्या विविध हेल्पलाईनलाही संपर्क करणे शक्य होते. सदर सुविधा ही चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कडून मोफत पुरविल्या जाणार असल्याचे सांगितले.
महिला सुरक्षा त्यासाठी महाराष्ट्रातील अहिल्या नगर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे की जिने महिला सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन या ॲपचे उद्घाटन केले याच माध्यमातून सर्वांनी आपल्या आपल्या मोबाईल मध्ये अप्लीकेशन घेऊन आपल्या सुरक्षेतेसाठी मोबाईल मध्ये ठेवण्यात यावे जेणेकरून आपत्कालीन काळामध्ये तुम्हाला या ॲपचा पुरेपूर पणे मदत घेऊन संकटापासून वाचवण्यात मदत करेल