अरुण फलके यांनी निंबळक जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढवावी नागरिकाची मागणी
आहिल्यानगर – निंबळक गटात अरुण फलके यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल पुन्हा एकदा सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. निमगाव वाघा येथील सरपंच पदाचा भक्कम अनुभव असल्यामुळे आणि गटाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आता जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व फलके यांनी करावे, अशी ठाम मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
सरपंच म्हणून काम करताना त्यांनी स्व अमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या माध्यमातून ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रम, तसेच शेतकरी कल्याण यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध प्रकारच्या योजना प्रत्येक घरापर्यत पोहचवण्याचे काम केले लोकाभिमुख निर्णय, सर्वसामान्यांशी सातत्याने संपर्क आणि विकासाच्या गतीला दिलेले प्राधान्य यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
जिल्हा परिषद स्तरावरही त्यांच्या नेतृत्वामुळे गटाला मजबूत दिशा मिळेल, विकासकामांना गती मिळेल आणि सर्व स्तरांवरील प्रश्न सोडवण्यास मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. वाढत्या जनसमर्थनामुळे फलके यांचे नाव जिल्हा परिषद गट नेतृत्वासाठी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.


