राहुल गंगार्डे यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कर्मचारी ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर

 राहुल गंगार्डे  यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कर्मचारी ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर

नगर -जिल्हा परिषद अहमदनगर यांचा “उत्कृष्ट कर्मचारी ऑफ द मंथ माहे ऑगस्ट 2023″पुरस्कार नगर तालुका पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी राहुल गंगार्डे  यांना जाहीर करण्यात आला
  
            जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत नगर पंचायत समिती येथील  अधिनस्त व ग्रामपंचायत इमामपुर तसेच पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायत मध्ये राहुल गांगर्डे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहे  सर्वांना बरोबर घेऊन काम करणे, आपल्या कामाचा ग्रामविकास विभागावर आगळावेगळा ठसा उमठविला. ग्रामपंचायत क्षेत्रात जल जीवन मिशन,स्वछ भारत मिशन ,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,घरकुल आवास योजना,तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचविल्या. विहित कालावधीत राबवून त्या योजना पूर्ण केल्या. स्वच्छ व पारदर्शक कारभार करणे या उल्लेखनीय व विशेष कार्याबद्दल त्यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा मानाचा असा उत्कृष्ट कर्मचारी ऑफ द मंथ माहे ऑगस्ट 2023* या पुरस्काराने सन्मानित करून पुरस्कार जाहीर करण्यात आला.  ग्रामसेवक यांना असा पुरस्कार देण्याची जिल्ह्यात ही पहिलीच वेळ आहे.
   राहूल गांगर्डे हे मुळचे मांदळी तालुका कर्जत येथील रहिवासी असून सध्या नगर पंचायत समिती येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे .नगरपंचायत समितीच्या ग्रामविकास विभागा च्या शिरपेचात यामुळे आणखी एक मानाचा तुरा लागला आहे
         त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक संवर्गाच्या वतीने  अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *