अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी ४ डिसेंबर२३पासुन राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार -सुमन सप्रे

अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी ४ डिसेंबर२३पासुन राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार -सुमन सप्रे
 ———————————–
नगर -महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समिती द्वारे विविध मागन्या मान्य न झाल्या मुळे ०४ डिसेंबर २०२३पासुन संपूर्ण महाराष्ट्र सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतीस कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहे. असे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती महाराष्ट्र साई श्रध्दा अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक सलग्न अहमदनगर चे अध्यक्ष सौ. सुमन साहेबराव सप्रे यांनी दिली.जिल्ह्यातील  अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी यांना नोव्हेंबर २०२३ चा महिन्याचा मासिक अहवाल ( एम पी आर) ,मासिक बैठका इतर माहिती व कामे करण्यात येणार नसुन सर्व कामकाजावर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी संपूर्ण बहिष्कार टाकन्याचा निर्णय कृती समिती युनियनच्या वतीने घेण्यात आला असुन, सर्वोच्च न्यायालयाचा CIVIL APPEAL no. 3153 Of  SIP CIVIL no.30193 of 2017मधील 25 एप्रिल रोजी ग्रॅज्युटी बाबत दिलेले निकालाची अंबलबजावणी करुन ती पूर्ण करण्यात यावी अंगणवाडी सेविका कर्मचारी पदे ही वैधानिक पदे कर्मचारी घोषित करुन त्या अनुषंघाने येणारी वेतणश्रेणी भविष्य निर्वाह निधी आदि सुरक्षा इत्यादि सगळे लाभ देन्यात यावेत.अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका २६००० ₹ मदतनीस २००००₹ मानधनात वाढ करण्यात यावी. कारण महागाई सतत  वाढले मुळे ते कमीच पड़ते आहे,तरी महंगाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधानात  वाढ करावी या प्रश्नाबाबत मा.आदितीजी तटकरे महिला व बाल विकास मंत्रीशी यांच्याशी चर्चा झाली.त्यानुसार मासिक निर्वाह भत्ता, पेंशन सेवा समाप्तीनंतर देन्याचा प्रस्ताव मा.मंत्री मान्य ‌केलेप्रमाणे नोव्हेंबर अखेरीस तयार करुन तो हिवाळी अधिवेशनात मंजुर करवून घेणे महानगर पालिका हददीत जागेचे निकष करून अंगणवाडीसाठी रुपये ५००० ₹ ते ८००० ₹ भाडे मंजुर करावे .आहाराचा ८ रूपये दर अत्यल्प असुन त्यामुळे कुपोषण निर्मुलण होणे ऐवजी उलट त्यात वाढ होत आहे.तरी हां दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा माननीय न्यायालयाचा अंतिम निर्णयाचे निकालाची अंबलबजावणी शासन पातळीवर हे निर्णय लवकरात लवकर करावें व अंगणवाडी सेविकांना
अंगणवाडीचे व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देन्यात येऊ नये .  न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका यांना दिलेले मोबाइल अत्यंत निकृष्ट ,खराब दर्जाचे असुन ऑनलाईन कामे होत नसुन नवीन मोबाइल किंवा मोबाइल खरेदी साठी रक्कम देन्यात यावी,६ नोव्हेंबर रोजी मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याच्या शक्यते बाबत निवेदन देन्यात आले होते. पंरतु त्यावर काहीही हालचाल झाली नसुन व त्याबाबत कोणतेही चर्चा बैठक आयोजित न केल्यामुळे कृती समितीच्या  माध्यमातुन राज्यातील अंगणवाडी सेविका- मदतनीस संपूर्ण कर्मचारींना नाईलाजाने ४ डिसेंबर २०२३ पासुन बेमुदत संपावर जात असुन माहे नोव्हेंबर २०२३ या महिन्याच्या मासिक अहवाल(एम.पी.आर )मासिक बैठका व इतर कोणतेही माहिती देणार नसल्याची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन  महाराष्ट्र कृती समितिचे वतीने *मान. मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे (मुख्यसल्लागार व मार्गदर्शक),* सौ.स्मिता औटी ,नैना चाबुकस्वार, शीला देशमुख,शिंगाडेताई, अनिता पालवे, आशा बुधवंत रासकरताई(पारनेर) , राजेश खरात, दरेकरताई(कोपरगाव), अनिता वाकचौरे, प्रमिला निळे, सविता ढवळे, आयशा पठाण,सुवर्णा अरले व अल्ताफ शेख यांनी निवेदन पत्रा व्दारे 
मा.महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार मा. महिला बाल विकास मंत्री कु आदिती तटकरे, महिला व बालविकास विभाग सचिव मा.आयुक्त मुबंई तसेच तालुका स्तरावर बाल. वि.अधिकारी यांना निवेदन पाठविले आहे. संघटनेचे आव्हाला नुसार बेमुदत संपावर  अहमदनगर जिल्ह्यातील ४००० च्या वर तर महाराष्ट्रातील १ लाखवर संख्येने कर्मचारी सहभागी होणार आहे. त्यामुळे शासनाचे काम रेंगळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तत्पूर्वी शासनाने या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकरिता होणाऱ्या आंदोलनाची तात्काळ दखल शासनाने घेण्याच आव्हान आयटक संघटना व कृती समितीने केल आहे.
आपले विश्वासू.,
सौ.सुमन सप्रे व सौ. स्मिता औटी  महाराष्ट्र साईश्रध्दा अंगणवाडी कर्मचारी संघटना अहमदनगर  ( आयटक सलग्न) जिल्हा अहमदनगर.
Mb no. 9960501537/9503748428.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *