श्री.रमेश भांबरे यांच्या मामाचा मळा कृषी पर्यटनास आदर्श कृषी पर्यटन पुरस्कार जाहीर…*
*रुईछत्तीशीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर…*
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे श्री.रमेश भांबरे यांचे मामाचा मळा मोठे कृषी पर्यटन केंद्र आहे.गेल्या पाच ते सात वर्षांपासून महाराष्ट्रात या पर्यटन केंद्राने मोठी गगनभरारी घेतली आहे.ग्रामीण भागात अतिशय सुसज्ज पद्धतीने हे पर्यटन केंद्र साकारले आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यातून येथे पर्यटक भेट देतात.विविध कृषी प्रदर्शनात मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्राचे वेळोवेळी नाव घेतले जाते. आज नाशिक येथे पार पडलेल्या अग्रगण्य प्रदर्शनात श्री.रमेश भांबरे यांना आदर्श कृषी पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गेल्या सात वर्षांपासून अनेक क्षेत्रीय भेटी , हुरडा पार्ट्या , मेजवान्या मामाच्या मळ्यात पार पडल्या आहेत.मामाच्या मळ्यातील विविध सुविधा , मनोरंजक केंद्रे पर्यटकांना भुरळ घालणारी आहेत.नाशिक शहरात पार पडलेल्या या कृषी प्रदर्शनात मिळालेला हा पुरस्कार राज्याच्या नकाशावर जाऊन उमटला आहे.
प्रसिध्द सिने अभिनेते , महाराष्ट्र राज्य फॉरेस्ट ब्रँड ॲम्बेसेडर मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.मिलिंद गुणाजी हे संपूर्ण भारतात फॉरेस्ट मॅन म्हणून ओळखले जातात. पुरस्कार प्रदान करतेवेळी नाशिक कृषी विभाग संचालिका मधुमती मॅडम , राज्य कृषी विकास पर्यटन अध्यक्ष पांडुरंग तावरे , साहिल नेहारकर , सुजाता बागचे संचालक नेरुळकर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील पर्यटन केंद्राचे संचालक , संस्थापक , प्रतिनिधी उपस्थित होते.रमेश भांबरे यांना या अगोदर जिल्हाधिकारी पी.अन्बलगन यांच्या हस्ते व तत्कालीन कृषीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देखील आदर्श कृषी पर्यटक पुरस्कार मिळाला आहे. भांबरे यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला असता कृषी पर्यटकांना शासनाने मदत करण्याचे आवाहन केले यावेळी सभागृहातील सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.रमेश भांबरे यांच्या मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्रास मिळालेला हा पुरस्कार गावच्या शिरपेचात व वैभवात रोवलेला मानाचा तुरा आहे