जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांवर आज रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. निमगाव वाघा तालुका नगर येथे आज येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून या सरकारचा जाहीर निषेध केला आहे .या सरकारने म्हशीच्या दुधाला व गायचे दुधामध्ये दहा रुपयांनी घट केल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झालेला आहे. म्हशीचा भाव 56 रुपये वरून 46 रुपये तर गाईचा दुधाचा भाव ३8 वरून २8 रुपये केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी झाले आहे. सध्या चाऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खुराकाचे भाव, सरकी पेंड ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कांडी पेड चौदाशे वरून सतराशे रुपये ,सरकी पेंड दोन हजार वरून 2650, वालीस बाराशे रुपये वरून 1750 रुपये झाले. सर्व प्रकारची चारा महागाई मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यावर अंबलबून असणाऱ्या या पोशिंदा, अन्नदात्याला आता उपाशी राहून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. दुधाची नासाडी केल्यानंतरच सरकारला जाग येणार का अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे. जर शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला हमीभाव मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन हे करण्यात येईल असा इशारा निमगाव वाघाचे शेतकरी भारत फलके यांनी दिला आहे.
नगर तालुक्यात शेतकऱ्याचे आंदोलन
__________________________________________
बुकींग सुरू
श्री साई डिजीटल फोटो व्हीडीओज
आमच्या कडे सर्व प्रकारच्या फोटोग्राफी व व्हीडीओजचे कामे केले जातील
उपलब्ध सुविधा
लग्नसमारंभ
प्रिवेंडीग,
पोस्टवेडीग,
इंडस्ट्रीयल
मॉडेलिंग फोटोग्राफी,
एनलार्ज
ड्रोन शुंटिग
बेबी शुट
एलईडी वॉल
जुने ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो कलर करून मिळतील
वर्तमान पत्रासाठी जाहीराती स्वीकारल्या जातील
प्रो. प्रा.नागेश सोनवणे
श्री साई डिजीटल फोटो व्हीडीओज
लोकमत पञकार , प्रेस फोटोग्राफर
केडगाव, हिंगणगाव ता. जि. अहमदनगर
फोन न.९९२२९२४६५५
९६८९७७७१९९