प्रभाग क्र. 8 व 15 मधील कल्याण रोड परिसरातील 20 कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण

 प्रभाग क्र. 8 व 15 मधील कल्याण रोड परिसरातील 20 कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ व लोकार्पण

कल्याण रोडचा विकास कामाच्या माध्यमातून आदर्श प्रभाग करण्याचा प्रयत्न – महापौर रोहिणी शेंडगे
     नगर – गेल्या 5 वर्षात कल्याण रोड परिसरातील विविध विकास कामांच्या माध्यमातून येथील नागरिकांना सर्वोतोपरि सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या प्रभागाची प्रतिनिधी व महापौर म्हणून प्रभागातील कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करुन देत येथील प्रत्येक भागातील कामे मार्गी लावली. 20 कोटी रुपयांच्या विकास निधी उपलब्ध करुन दिल्याने विकास कामे मार्गी लागली. सहकारी नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामांना चालना मिळाली. कल्याण रोड हा भाग दोन प्रभागात विभागला गेला आहे, परंतु दोन्ही प्रभागातील नगरसेवकांच्या सहकार्याने या भागातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविली.  कल्याण रोड भागात 15-15 दिवस पाणी येत नसे, परंतु अमृत योजना, फेज-2 योजनेच्या माध्यमातून या भागात आता 2-3 दिवसांत पाणी पुरवठा होत आहे. या भागातील बहुतांश ओपन स्पेस विकसित करुन ओपन जिम निर्माण करण्यात आल्या आहेत. पुर्ण शहरभर एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यात आले, शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरण, जलतरण तलाव दुरुस्त करुन तो सुरु करण्यात आला, अशी विविध विकास कामांच्या माध्यमातून शहराच्या विकासात भर पडली आहे. आज शुभारंभ होत असलेल्या विविध कामांच्या माध्यमातून हा भाग आदर्श कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
     प्रभाग क्र. 8 व 15 मधील कल्याण रोड परिसरातील 20 कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ व लोकापर्ण सोहळ्याचे महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी महिला बाल कल्याणच्या सभापती पुष्पताई बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, प्रशांत गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, पोलिस उपाधिक्षक हरिष खेडकर, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेविका सुरेखा कदम, दत्ता कावरे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, प्रा.खासेराव शितोळे, भगवान गाडे, अ‍ॅड.जयंत जाधव, दत्ता जाधव,  पारुनाथ ढोकळे, शेखर उंडे, संजय गोसावी, प्रा.जगताप  आदिंसह कल्याण रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते.
     प्रा.शशिकांत गाडे म्हणाले, शिवसेनेने शहराला चार महापौर दिली, या महापौरांच्या काळात शहरत विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली. आता काही दिवसांतच राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, त्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे यांनी मनपाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे विकास कामांबरोबर सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात योगदान दिले आहे.
     शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, पुर्वी आम्ही ज्या रोडसाठी आंदोलन करायचो, त्याच रोडचे लोकार्पण होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी शिवसेनेचे महत्वाचे योगदान राहिले आहे. गेल्या 5 वर्षात शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सहकार्याने शहराच्या विकासात भर पडली असल्याचे सांगितले.
     याप्रसंगी पुष्पताई बोरुडे म्हणाले, प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्याने प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्न सोडण्यास मदत झाली. नागरिकांना सर्वतोपरि सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक भागातील नागरिकांचे कामाच्या माध्यमातून समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.
     यावेळी दत्ता जाधव म्हणाले, नगरसेवकांच्या समन्वयातून आज कल्याण रोड भागाचे चित्र पलटले आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, ओपन स्पेसचे सुशोभिकरण अशा विविध विकास कामांमुळे या भागाचा कायापालट झाला आहे. विकास कामे झाल्याने  भागातील वसाहतींची संख्याही वाढत आहे.
     याप्रसंगी सचिन शिंदे म्हणाले, पुर्वीचा कल्याण रोड आणि आताचा विकासित झालेला परिसर यात मोठा फरक झाला आहे. नागरिकांनी सोयी-सुविधा पुरवत या भागात चांगली विकास कामे झाली असल्याचे सांगितले.
     शाम नळकांडे यांनीही प्रभागाच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटत असल्याचे समाधान आहे. महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी विशेष निधी उपलब्ध करुन देत येथील विकास कामांना चालना मिळाली. परिसरातील नागरिक यांची मिळालेली साथ, अनुभवी नगरसेवकांचे मार्गदर्शनामुळे प्रभागात काम करतांना नागरिकांशी कौटूंबिक नाते निर्माण झाले आहे, त्याविषयी आठवणी सांगताना शाम नळकांडे भावूक झाले.
     याप्रसंगी खासेराव शितोळे म्हणाले, कल्याण रोड हा परिसर कायम दुर्लक्षित राहिला आहे, परंतु गेल्या 5 वर्षात नगरसेवकांच्या अथक प्रयत्न महापौर रोहिणीताई शेंडगे यांचे सहकार्यांमुळे या भागातील मुलभुत सुविधाबरोबरच प्रभागाच्या विकासात भर टाकणारे कामे झाली.
     याप्रसंगी गणेश कवडे, भगवान फुलसौंदर आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर  आभार पारुनाथ ढोकळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *