नगर – सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण , गतीशिल आणि कृतिशील रस्त्यांचा विकास..

 नगर – सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण , गतीशिल आणि कृतिशील रस्त्यांचा विकास..

रुईछत्तिशी – नगर – सोलापूर महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून अतिशय वेगाने सुरू आहे.उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडणारा महामार्ग म्हणून हा महामार्ग ओळखला जातो.पंढरपूर , अक्कलकोट , गाणगापूर अशी देवस्थाने या महामार्गामुळे प्रकाशझोतात आली आहेत.गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून या महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती.खासदार सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत वारंवार हा प्रश्न उपस्थित करून रस्त्याची समस्या मार्गी लावली.सध्या महामार्ग अतिशय जोरात वाहत असून नवीन वर्षात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. नगर शहरात होणार व्यापार या महामार्गामुळे गतिशिल होणार आहे.मागील दहा ते बारा वर्षांपासून नगरकडे येणारी वाहतूक स्थानिक मार्गे जात होती आता ही सर्व वाहतूक महामार्गाने शहराकडे जाणार असल्याने मार्गावरील सर्व गावे प्रकाश झोतात येणार आहेत.
          शैक्षणिक गुणवत्ता देखील सुधारणार आहे.उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते विशेषत मुलींना शिक्षण घेण्यासाठी आता हा मार्ग सुलभ झाला आहे.मध्यंतरी रस्ता खराब असल्याने पालक वर्ग मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होते.आता रस्ता सुसाट झाल्याने मुलींच्या शिक्षणाचे दरवाजे जास्त खुले झाले आहेत.ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरेशा मिळत नव्हत्या आता शहराकडे आरोग्य सुविधा घेण्यासाठी वेळेवर पोहोचता येणार असल्याने लोकांच्या जीवनात नगर – सोलापूर महामार्ग गतिशित आणि कृतिशील ठरला आहे.
“पुढील नवीन वर्षात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध केल्याने आगामी दोन महिन्यात अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे.
      खा.सुजय विखे , नगर दक्षिण लोकसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *