नगर – सोलापूर महामार्गावरील अनेक समस्यांबाबत खा.सुजय विखे व माजी मंत्री कर्डिले यांना निवेदन..*
*रुईछत्तिशी , अंबिलवाडी , मठपिंप्री , हातवळण ग्रामस्थांचा पुढाकार..
रुईछत्तिशी – नगर – सोलापूर महामार्ग अतिशय वेगाने सुरू झाला आहे. महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ग्रामीण भागातील लोकांना सुलभ पद्धतीने प्रवास करता यावा व दैनंदिन गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात यासाठी रुईछत्तिशी , मठपिंप्री , अंबिलवाडी या गावातील ग्रामस्थांनी खासदार डॉ.सुजय विखे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना निवेदन सादर केले.या मार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रुईछत्तिशी येथून जातो या रस्त्याला हातवळण , मठपिंप्री या गावांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड ठेवण्यात आला नाही तसेच रुईछत्तिशी येथे बायपास जवळ सर्कल बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.अंबिलवाडी येथे भुयारी मार्गाची व्यवस्था करावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे.महामार्ग अतिशय सुसज्ज पद्धतीने तयार करण्यात आला आहे पण ग्रामीण भागातील लोकांना येणाऱ्या अडचणी या खासदार विखे आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मार्गी लावाव्यात अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदन देताना खासदार विखे व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , अभिलाष घिगे , दादासाहेब दरेकर , रमेश भांबरे , बाळासाहेब मेटे , भरत भुजबळ , धनंजय खाकाळ , नाथा शेटे , केशव वाबळे , सचिन ढवळे , अंकुश नवसुपे , बबन गोरे , सचिन ढवळे तसेच रुईछत्तिशी , आंबीलवाडी , मठपिंप्री गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. रुईछत्तिशी येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात गेल्या एक वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पशू वैद्यकीय अधिकारी लवकर हजर करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे.