*माजी उपसभापती रविंद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना प्रमुख प्रविण गोरे यांच्या रणनीतीने उपसरपंच पदाचा भरला अर्ज…*
“नगर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर , माजी चेअरमन अंकुश गोरे , युवा सेना तालुका प्रमुख प्रविण गोरे यांनी निलेश गोरे यांच्या रूपाने रुईछत्तिशी उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.निलेश नामदेव गोरे हे सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री.अंकुश गोरे यांचे पुतणे आहेत.वार्ड क्रमांक ३ मधून सर्वात कमी वयात निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला होता.मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथा पालथ मध्ये अंकुश गोरे यांनी सत्ताधारी नेतृत्व झुगारून देऊन विरोधी गटाकडे आगेकूच केली. विरोधी गटाने देखील निलेश गोरे यांच्या उमेदवारी अर्जावर होकार दाखवून उमेदवारी अर्ज दाखल केला पण सत्ताधारी गटाचे बहुमत असताना देखील त्यांनी अर्ज दाखल करून निवडणूक घेण्यास भाग पाडले.सत्ताधारी गटाचे एक मत आपल्या बाजूने खेचून आणून थोडीफार राजकीय कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न गाव पातळीवरील मोठी राजकीय गुंतागुंत मानली जात आहे हे नक्कीच खरे आहे.मतांचे बहुमत नसताना उमेदवारी अर्ज भरून एक मत फोडणे देखील प्लसचे राजकरण समजले जाते. माजी चेअरमन अंकुश गोरे यांनी आगामी काळात गावच्या राजकरणात मोट बांधून पुन्हा लढा देण्याचा एल्गार पुकारला आहे.