राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण दिव्यांग सेल च्या जिल्हाध्यक्षपदी रत्नाकर ठाणगे यांची नियुक्ती…..

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण दिव्यांग सेल च्या  जिल्हाध्यक्षपदी रत्नाकर ठाणगे यांची नियुक्ती…..

   दिव्यांग बांधवांच्या न्याय व हक्कासाठी  कायम लढा देवुन दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत  प्रभावीपणे कार्य करत असलेले  अहमदनगर रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तथा आधार अपंग विकास संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग सेल च्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनील तटकरे यांच्या मान्यतेने व उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली  . या निवृत्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की आपण राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील ,  असा मला विश्वास आहे .  त्यामुळे मी आपली निवड करून आपल्या भावी कार्यास शुभेच्छा देत आहे .  
या निवडीचे पत्र काल मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रत्नाकर ठाणगे यांना दिले आहे .
   यावेळी  ठाणगे म्हणाले की , ही निवड माझ्या एकट्याची नसून माझ्या बरोबर काम करणाऱ्या सर्व दिव्यांग माय बाप जनतेची आहे . दिव्यांग क्षेत्रात काम करत आसताना अनेक आडचणींना दिव्यांगाना सामोरे जावे लागते . अहमदनगर जिल्ह्यत मागिल दहा वर्षात दिव्यांगासाठी आनेक योजना राबवल्या आहेत . जे काही दिव्यांग व्यक्ती आपल्या सुख सवलती पासपासून वंचीत असेल तर त्यांना त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे . तसेच लवकरात अहमदनगर दक्षिण मतदार संघातील प्रत्येक गांव निहाय दौरा करून दिव्यांगाच्या  योजना रावविव्यासाठी प्रयत्न करणार आहे . तसेच लवकरात लवकर नवीन कार्यकारिणी तयार करण्यात येईल असे ठाणगे म्हणाले . 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे ,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गायकवाड , आमदार संग्राम जगताप ,   आ. निलेश लंके ‘ राष्ट्रवादी कॉंगेस चे जिल्हाध्यक्ष उत्तर कपील पवार ,  शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते , राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल चे  अध्यक्ष विनोद साळवे , शहानवाज खान , बाबा शेख, शेखर बोत्रे , चंद्रकांत वाघमारे , यांनी ठाणगे यांचे अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *