रुईछत्तिशी गावच्या उपसरपंच पदी आशाबाई अंबादास वाळके यांची निवड..
६ – ५ अशी झाली लढत..
देविदास गोरे..
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी हे गाव राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचे समजले जाते.गेल्या दोन महिन्यांपूर्वी या गावच्या उपसरपंच प्राजक्ता भांबरे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे ही निवड प्रक्रिया आज पार पडली.चेअरमन रमेश भांबरे , श्रीकांत जगदाळे सर , सरपंच विलास लोखंडे यांच्या गटाकडून आशाबाई अंबादास वाळके तर विरोधी माजी उपसभापती रविंद्र भापकर व शिवसेना युवा तालुका प्रमुख प्रविण गोरे यांच्या गटाकडून निलेश नामदेव गोरे यांनी अर्ज दाखल केले होते.दोन्ही गटाकडून अर्ज दाखल केल्याने गुप्त मतदान पद्धती घेण्यात आली.रमेश भांबरे गटाकडे ०७ मतदान होते तर विरोधी गटाकडे ०४ मतदान होते पण प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धतीत आशाबाई वाळके यांना ०६ तर निलेश गोरे यांना ०५ मते मिळाली , विरोधी गटाला एक मतदान जास्त मिळाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली मात्र रमेश भांबरे गटाचा उपसरपंच झाल्याने गेली २० वर्षापासून असणारी सत्ता अबाधित राहिली.
२०२१ साली झालेल्या निवडणुकीत रमेश भांबरे गटाने ०७ जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते.विरोधी गटाला ०४ जागा मिळाल्या होत्या पण मध्यंतरी झालेल्या राजकीय घडामोडीत विरोधकांनी सत्ताधारी गटाला आव्हान देण्यासाठी राजकीय खेळी खेळली , एक मत बाजूला निघाले पण विजय मिळवता आला नाही.आशाबाई वाळके यांच्या उपसरपंच निवडीने भाजपला उभारी मिळाली असून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे रुईछत्तिशी वरील वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.रुईछत्तिशी गावठाण वॉर्डातील सदस्यास उपसरपंच पद मिळाल्याने पुन्हा प्रभाग अबाधित ठेवण्यासाठी ही राजकीय खेळी खेळण्यात आली आहे.आशाबाई अंबादास वाळके यांच्या उपसरपंच निवडीने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.निवडणूक प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी परभणे यांनी पार पाडली यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य , पदाधिकारी उपस्थित होते..