अहिल्यानगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांची निवड.

अहिल्यानगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांची निवड.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर तालुक्यात च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी खासदार निलेश लंके यांची विश्वासू सहकारी चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार यांची निवड आज करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके साहेब व माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे ,जिल्ह्याचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते किसनराव लोटके सर, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे,जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ,जिल्हा सरचिटणीस सिताराम काकडे सर, उपाध्यक्ष प्रकाश पोटे,उद्धवराव दुसुंगे,
शरद बडे. केशव तात्या बेरड,पापामिया पटेल,चंदूकाका पवार,
यांनी तालुकाध्यक्ष पदाचे पत्र दिले.
यावेळी
महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संपतभाऊ मस्के, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके,बाजार समितीचे माजी चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, ज्येष्ठ नेते आबा कोकाटे सर,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत,माजी सभापती प्रवीण कोकाटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण मस्के, डॉक्टर मारुती ससे, गणेश तोडमल,महेंद्र शेळके,पोपट निमसे,संदीप कोकाटे, महादेव खडके, गटनेते वैभव कोकाटे, संदीप काळे, प्रकाश कांबळे,बाबा सय्यद, संतोष कोकाटे यांच्यासह
अहिल्यानगर तालुक्यातील अनेक गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नगर येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरपंच शरद पवार यांनी बोलताना सांगितले की देशाचे नेते व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू,फुले,आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालत असलेल्या महाराष्ट्रात पवार साहेबांचे मार्गदर्शन घेऊन यापूर्वीही पक्षाचे ध्येयधोरण व सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले.
आणि आज त्याची पावती म्हणून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब खासदार निलेश लंके साहेब,माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे,लोटके सर यांनी माझ्यावर विश्वास टाकून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली निश्चितच अहिल्यानगर तालुक्यातील सर्वसामान्यांचे गोरगरीब सर्वसामान्य नागरिक महिला भगिनींचे प्रश्न मांडण्यासाठी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सरपंच शरद पवार यांनी अनेक दिवसापासून सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे शासन दरबारी मांडलेले आहेत.
आणि निश्चितच अहिल्यानगर तालुकाध्यक्ष पदाची त्यांच्याकडे धूरा आल्याने पक्षाची विचारधारा घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील व ते शासन दरबारी लढतील असा आमचा विश्वास आहे.

  • – खासदार निलेश लंके साहेब.

सरपंच शरद पवार सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा संघर्षातून पुढे आलेला तरुण सरपंचाला तालुका अध्यक्ष पदाची संधी दिल्याने निश्चित पक्षाला,महाविकास आघाडीला फायदा होईल.

  • – माजी मंत्री प्राजक्त तनपुरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *