गुरु नगरी ट्रेकर्स चे दिमाखदार सोहळ्यात अनावरण*
अहमदनगर -आज चांदबिबीचा महाल येथे अहमदनगर शहरातील शिक्षकांनी तयार केलेल्या गुरु नगरी ट्रेकर्सचे अनावरण नगर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दांपत्य हेमंत देशपांडे व सौ. प्रीती देशपांडे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ,दैठणे गुंजाळचे सरपंच बंटी गुंजाळ, विक्रांत जिमचे संचालक विक्रांत टेकाडे व उद्योजक बब्बुशेठ सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते व शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी बोलताना नगर शहरातील प्रसिद्ध सर्जन व एवरेस्ट बेस कँपपर्यंत जाऊन आलेले डॉक्टर हेमंत देशपांडे म्हणाले की
प्रत्येकाचे जीवन फार धावपळीचे झालेले आहे प्रत्येक माणसाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे *helth is wealth* आपले आरोग्य जर चांगले असेल तरच आपण जीवनामध्ये सुखी आणि समाधानी जगू शकतो. गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही रोज सकाळी आरोग्यासाठी चांदबिबी महालापर्यंत येतो असेही ते म्हणाले
आपण सर्व गोष्टीचे नियोजन करतो सर्व बाबींची काळजी घेतो परंतु आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अक्षम्य निष्काळजीपणा करतो या भावनेतून आरोग्याबाबत एक नवीन संदेश समाजासमोर जावा, आरोग्याचे महत्त्व समाजाला पटावे,या ग्रुपकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी हा एकमेव हेतू गुरुनगरी ट्रेकर्स ग्रुपचा आहे त्यातूनच या ग्रुपची निर्मिती झालेली आहे असे या ग्रुपचे संचालक श्री गणेश कुलांगे यांनी यावेळी बोलताना सांगितले
गुरु नगरी ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य महाराष्ट्र राज्यातील विविध गडकिल्ल्यांना भेटी देऊन गडकिल्ल्यांचा अभ्यास करणार आहेत व त्यातूनच प्रेरणा घेऊन नवीन पिढीला संदेश देण्याचे कार्य करणार आहोत असा संकल्प चंद्रभान नरसाळे यांनी व्यक्त केला.
महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे सकाळी 2 तास प्रत्येकाने आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवे हा संदेश डॉ प्रीती देशपांडे यांनी दिला.
मी सुद्धा तुमच्या गुरुनगरी ट्रेकर्स ग्रुप तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ट्रेकिंग मोहिमेत सहभागी होणार आहे हाच खरा जीवनाचा आनंद आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती व खो-खो चे राष्ट्रीय खेळाडू बाळासाहेब हराळ यांनी केले
या ग्रुप कडून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक आरोग्याकडे निश्चितच गांभीर्याने पाहून मानसिक व शारीरिक तणावमुक्त होतील असा विश्वास दैठणे गुंजाळचे सरपंच वस्ताद बंटी गुंजाळ यांनी यावेळी व्यक्त केला
प्राथमिक शिक्षकांना कामाचा व्याप वाढलेला आहे रोज नवीन नवीन शासनाची काही धोरण येत आहेत ते आपल्याला राबवावे लागतात त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब होते व मानसिक तणावातुन आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळेच मानसिक तणावातून मुक्त होणे व आरोग्याकडे लक्ष देणे या हेतूनेच आम्ही सर्व मित्रांनी मिळून हा अभिनव उपक्रम राबवण्याचे ठरविलेले आहे असे अध्यक्षपदाहून बोलताना शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी सांगितले
याप्रसंगी गुरु नगरी ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य सचिन नाबगे संदीप ठाणगे गणेश गाडेकर, राजेंद्र ठोकळ, प्रकाश नांगरे, बाळासाहेब कापसे, संतोष आंबेकर, शंकर पवार, योगेश पवार, गणेश तलवारे, गहिनीनाथ पिंपळे, सतीश ठोकळ, यश ठोकळ व इतर सदस्य उपस्थित होते.
प्रस्ताविक राजेंद्र ठोकळ , आभार प्रकाश नांगरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गहिनीनाथ पिंपळे व सचिन नाबगे यांनी विशेष कष्ट घेतले.