कर्डिले ज्याच्या मागे त्याचा पराभव निश्चित
प्रा . गाडे यांनी डागली तोफ
कर्डिले ज्याच्या बरोबर त्याचा पराभव: प्रा. गाडे
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्व सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले ज्याच्याबरोबर व पाठीमागे आहेत, त्यांचा पराभव नक्की आहे. कारण गेल्या अनेक निवडणूकीतील हा अनुभव आहे. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांना आमदार होवू देणार नाही, त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे जोरात प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून सर्व सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना खासदार करा असे आवाहन जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले आहे.