नगर- नगर तालुक्याला पाणीपुरवठा करणारी बुऱ्हानगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी मनपा पाणी योजना या दोन्ही पाणी योजनेचे नियोजन नसल्यामुळे शुध्दीकरण झाल्यानंतरचे वेस्ट तसेच चांगल्या प्रतीचे पाणी मोठ्या प्रमाणान विळद येथील शेतकयाच्या ऊसाच्या शेतात साचत आहे. यामुळे ऊसाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. या पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर विळद येथील पंप हाऊसच्या मोटारी बंद करणार, पाणी पुढे जाऊ देणार नाही असा इशारा शेतकरी दत्ता खताळ यांनी दिला आहे. याबाबत चे निवेदन महानगर पालिकेला दिले आहे.
विळद ( ता. नगर ) येथील गट न.१२२ रेल्वे लाईन च्या जवळ असणाऱ्या शेतकऱ्याच्या ऊसामध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे .विळद येथे पाणी योजनेचे वॉटर शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पा मधून शुध्दीकरण केल्यानंतसे जे पाणी उरते तसेच लिकेज चे पाणी असे १०० ते २०० हॉर्स पावर मोटारीतून पाणी जाईल ऐवढे पाणी शेतकयाच्या शेती मध्ये पाणी येते. या शेतामध्ये वर्षभर पाणी असते. यामुळे तीन एकर शेतामध्ये लावलेला ऊसाचे नुकसान तसेच दोन एकर जमीन पडीक ठेवण्याची वेळ आली असल्याचे दत्ता खताळ यांनी सांगीतले.
यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे परिमल निकम यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरही दिले जात आहे. प्रत्यक्षात आयुक्त, पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम , महापौर यांनी पाहणी करूनही अध्यापही या पाण्याचा कुठल्या प्रकारचा तोडगा काढलेला नाही.
या पाण्याची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी केली. शेतकऱ्याना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगीतले
चौकट
लोकाना पिण्यासाठी पाणी नाही. मनपा कडे करोडो रुपायाचे विज बील थकले आहे. पाण्याचा प्रंचड उपसा होत आहे. मनपाकडे पाण्याचे नियोजन नाही.बुऱ्हाणनगर पाणी योजने कडे पाहण्यासाठी पदाधिकारी नसल्यामुळे लक्ष नाही. या शेतकऱ्याना न्याय मिळाला नाही तर कोर्टाचा दरवाजा ठोठावणार तसेच आयुक्त व जिल्हा परिषद येथे आंदोलन करणार. असल्याचे माजी जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगीतले.