रुईछत्तिशी येथे रामलल्लाची अक्षता कलश मिरवणूक…*
देविदास गोरे , रिपोर्टर …
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी येथे आज रामलल्लाची अक्षता कलश मिरवणूक काढण्यात आली.२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न होत आहे. गावोगावी अक्षता कलश मिरवणूक काढून प्रभू रामचंद्रांनी अस्मिता जोपासली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून राम मंदिराचे काम मोदी सरकारने हाती घेतले होते.२२ जानेवारी रोजी संपूर्ण जगाचे लक्ष राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागून राहिले आहे.गावातील तरुण वर्ग , माता – भगीनी , लहान अबाल वृध्द हे सर्व जण अक्षता कलश मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांनी भव्य रथ तयार करून अक्षता कलशाचे पूजन केले व भजनी मंडळांनी राम लखन जानकी , बोलो जय हनुमान की गजर करत संपूर्ण गावातून कलशाची भव्य मिरवणूक काढली.नगर तालुक्यातील सर्वच गावातून श्रीराम कलशाची मिरवणूक काढण्यात आली आहे.२२ जानेवारी रोजी अनेक ग्रामस्थ , भक्तगण अयोध्याकडे रवाना होणार आहेत.घराघरात प्रभू रामचंद्रांची मूर्तीची पूजा करून श्रीराम जय राम जय जय राम असा जयघोष करत फुलांची उधळण करण्यात येणार आहे..

