नगर- नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक, तलाठी तसेच इतर शासकीय यंत्रणेत काम करणारे कर्मचारी यांना बरोबर घेऊन गावातील प्रत्येक घरी जाऊन समस्या अडचणी सोडवण्यासाठी सरपंच आपल्या दारी हा उपकृम सुरू केला आहे.
खडकी ( ता. नगर ) येथील सरपंच प्रविण कोठुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु केला आहे. आठवड्यातून एक दिवस प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना येणाऱ्या अडीअचणी काय आहेत याची विचारपूस करून शक्य होईल त्या लगेच आठवड्याच्या आत सोडवण्यात येईल असे या वेळी सरपंच प्रविण कोठुळे यांनीग्रामस्थांना संगीतले यावेळी ग्रामस्थांनी श्रावण बाळ योजना, विभक्त , दुबार कूपन , लाईट रस्त्या, आरोग्य. विषयी समस्या,बचत गट मार्फत कामा कसे घेता येतील, इतर कृषी गट स्थापन,, फ्रूट कंपनी, विमा कसा भरायचा वगैरे, पोस्टाच्या योजना आदी विषयी येणाऱ्या समस्या ग्रामपंचायत च्या पदाधिकारी यांच्या समोर मांडल्या.. या उपक्रमा मध्ये ग्रामसेवक, तलाठी ,वायरमन, सरकारी डॉक्टर ,अंगणवाडी, बचतगट,आरोग्य सेविका, ग्रामपंचायत शिपाई, रोजगार सेवक कृ,,,षी अधिकारी यांनी व सरपंच यांनी प्रत्यक्ष घरी जावून नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमाचे ग्रामस्थानी स्वागत केले.