नगर तालुक्यातील या गावातील फेर तलाठी कार्यालयातून गायब

चिंचोडी पाटील तलाठी कार्यालयातून फेरचे बुक गायब

 आहिल्यानगर – चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर,येथील तलाठी कार्यालयातून फेर नंबर 3316 ते 3504 या नंबरचे 188 फेर चे दोन बुक गायब झाल्याची तक्रार चिंचोडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे केली याबाबतचे निवेदन देण्यात आले. 

महोदय,,

     वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो कि मोजे चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील तलाठी कार्यालयातून अनेक दिवसापासून 188 फेर गायब आहेत,अनेक शेतकऱ्यांना सोसायटी कर्ज,बँक कर्ज,जमीन खरेदी विक्री,खाते वाटप,सर्च रिपोर्ट या कामाकरिता फेर लागतात व हे फेर गायब असल्याने सदर ठिकाणी लोन मंजूर होत नाही, शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

मागील काही दिवसापूर्वीच गावातील गट नंबर 1026 मधील 51 गुंठे जमीन मालक कौसाबाई मारुती सरोदे यांनी कुठलेही खरेदीखत,गहानखत न करता बेकायदेशीर चोरी झालेली आहे. या प्रकरणाची पुनरावृत्ती या फेरमध्ये दडलेली असावी असे अनेक ग्रामस्थ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.काही दिवसापूर्वी या प्रकरणी वृत्तपत्रात बातमी छापल्या होत्या.त्यामुळे सदर फेरची चौकशी होऊन ज्या तलाठी/सर्कल  व संबंधितांनी हे फेर गायब केलेले आहेत,त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही व्हावी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *