रुईछत्तिशी येथील सीना बंधाऱ्यावरील फळ्यांची चोरी , प्रशासनाचे दुर्लक्ष….*

 रुईछत्तिशी येथील सीना बंधाऱ्यावरील फळ्यांची चोरी , प्रशासनाचे दुर्लक्ष….*

देविदास गोरे…
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथील सीना नदी बंधाऱ्यावरील फळ्यांची चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.गेल्या दहा वर्षापूर्वी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निधीतून या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले होते.उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना हा बंधारा पाणी अडवून  शेतकऱ्यांना वरदान ठरतो.फेब्रुवारी महिन्यात हा बंधारा अडवून पाण्याची मोठी बचत केली जाते. नदी काठावरील असणाऱ्या शेतजमिनी या बंधाऱ्यामुळे ओलिताखाली राहतात.गेल्या आठ दिवसांपूर्वी २७ व दोन दिवसांपूर्वी १५ फळ्या चोरीला गेल्याचे दिसून आले.जलसंधारण विभागाला ही माहिती लगेच कळवण्यात आली पण त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. दोन टप्प्यात चोरी झाल्याने त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे.नगर तालुका पोलिस स्टेशनला याची माहिती देण्यात आली आहे.आता पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून पुन्हा नव्याने फक्या शक्य होणार नाही त्यामुळे यावर लगेच कार्यवाही करून पुन्हा नव्याने फळ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सीना नदीवरील हा बंधारा नगर आणि बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना वरदान ठरत असल्याने प्रशासनाचे लगेच कार्यवाही करणे गरजेचे आहे.जलसंधारण विभाग या बाबतीत बेदखल राहिल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“नगर तालुका पोलिस स्टेशनला संपर्क केला असता त्यांनी या गोष्टीचा चोख बंदोबस्त केला जाईल असे सांगितले.नवीन फळ्या उपलब्ध करण्यासाठी खा.सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
 “रवींद्र भापकर , मा.उपसभापती ,   पंचायत समिती , नगर तालुका..
“जलसंधारण विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करून पुन्हा नव्याने फळ्या उपलब्ध करण्यासाठी मदत केली जाईल.पोलिस प्रशासनाने याची पूर्णपणे कार्यवाही करावी.
“गायसमुद्रे साहेब , जलसंधारण विभाग , अहील्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *