भानुदास कोतकर यांच्या सेवापुर्तीनिमित्ताने गौरव समारंभाचे आयोजन

 .भानुदास कोतकर यांच्या सेवापुर्तीनिमित्ताने गौरव समारंभाचे आयोजन

नगर : प्रतिनिधी
ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि मुख्याध्यापक भानुदास कोतकर ह्यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.   कोतकर ह्यांचा सपत्नीक गौरव समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. ३० मे) दु. १२ वा. श्री क्षेत्र धरमपुरी निंबळक येथे करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि शेतकरी संघटनेचे नेते संदीप गेरंगे ह्यांनी दिली. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. संजय कळमकर , माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडुस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्करराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
 भानुदास कोतकर ह्यांनी विद्यालयात तब्बल ३८ वर्षे प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले. त्यांना सन १९९८ मध्ये जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी खा. यशवंतराव गडाख आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. 
सन २०२२-२३ मध्ये जिल्हा गणित अध्यापक संघटनेकडून जिल्हास्तरीय कृतिशील गणित अध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सन २२-२३ चा तालुकास्तरीय कृतिशील गणित व विज्ञान अध्यापक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.  कोतकर ह्यांनी सन २०१७ ला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करून तब्बल १२ लाखांचा कृतज्ञता निधी संकलित केला. त्यातून विद्यालयात अद्ययावत सोईसुविधा निर्माण करण्यात ते अग्रभागी होते. सन २०१९ मध्ये  कोतकर ह्यांना पदोन्नतीने विद्यालयाच्या  मुख्याध्यापकपदी काम करण्याची संधी मिळाली. सेवेच्या काळात विद्यालयात अमुलाग्र असे बदल घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यालयाचा शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.
  कोतकर ह्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघ, त्रिदल सैनिक संघटना, साने गुरुजी प्रतिष्ठान, ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळाचे सेवकवृंद, निंबळक क्रीडा मंडळ प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *