पारनेर मतदार संघातील दबंगागिरी मुळासगट उपटून फेका -आ. काशीनाद दाते यांचा खासदार निलेश लंकेवर जोरदार टिका.
वाईट प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधी पासून सावध रहा आ.दातेचे तरुणा ना अवाहन
अकोळनेर येथे आ. दाते सर यांचा नागरी सत्कार
निंबळक-पारनेर नगर मतदार संघात पाच वर्षापासून चाललेली दंबगगिरीला नागरिक कंटाळले होते. हिच दंबगगिरी आता मुळासगट उपटून फेकून घ्यायची आहे .विधानसभेत जशी जागा दाखविली तसे आता पाच वर्षानी येणाऱ्या लोकसभेत करायचे आहे. अश्या वाईट प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधी पासून तरुणांनी सावध रहा . येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीत थारा देऊ नका अशा प्रवृत्तीच्या लोकाना गाडून टाका असा टोला आमदार काशीनाथ दाते यांनी खासदार निलेश लंके यांचे नाव न घेता केली.
अकोळनेर ( ता. नगर ) येथे नवनिर्वाचित पारनेर नगर मतदार संघाचे आमदार काशीनाथ दाते यांचा सत्कार चा कार्यक्रम आयोजीत केला होता यावेळी ते बोलत होता. या कार्यक्रमासाठी सरपंच प्रतीक शेळके, रमेश जाधव,सुनील उमाप, राजेंद्र शेळके,भाऊ भोर, बाबासाहेब जाधव, आप्पासाहेब सप्रे,संजीव भोर, वसंत चेडे, अशोक झरेकर, काशिनाथ चोभे, राजेंद्र कोतकर, मारुती, भाऊसाहेब जऱ्हाड, दादाभाऊ चितळकर, अरुण होळकर, नाना बोरकर ,सागर सप्रे, विक्रम कळमकर, पोपटराव घुंगार्डे यावेळी उपस्थित होते. यावेळी दाते म्हणाले नगर तालुक्यात माझा संपर्क कमी होता. मात्र माझ्या राजकारणाची चाळीस वर्षाची यशस्वी वाटचाल होती. पारनेर तालुक्यात सर्वाधिक निवडणुक केल्या त्यामध्ये यश मिळवल.. मी दहावे, अंत विधी वाढदिवसाला जातो मात्र त्याचे कधीच फोटोसेशन करत नाहीत. मात्र गेल्या पाच वर्षात प्रसिद्धीचा नविन फंडा आला आहे दुखत घटनेची हि प्रासिद्धी केली जाते असे लोकप्रतिनिधी जन्माला आले. त्याचा पाच वर्षाचा कार्यक्रम विधानसभेच्या निवडणुकीत केला. हा कार्यक्रम लोकसभेला व्हायला पहिजे होता. नगर तालुक्यात माजी खासदार सुजय विखे पाटील, आ. शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यानी माझ्यासाठी जिवाचे रान केले. समोरच्या उमेदवाराला प्रचारासाठी भरपूर वेळ होता मोहटा देवी दर्शन, महिलांना घरपोहच साडया देण्याचे काम केले. मात्र मला फक्त बारा दिवस प्रचाराला मिळाले .पारनेर पेक्षा नगर तालुक्याने चांगली परिस्थिती दाखवली. शेवटपर्यत लिड राहिले. पारनेर मतदार संघातील नागरिक लोकप्रतिनिधीच्या दंबगगिरीला कंटाळले आहे. पाच वर्षात तरुणाचा भ्रमनिरास झाला.एमआयडिसी मध्ये एकाही तरुणाला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. हे नेतुत्व राज्याचे नेतत्व करायला निघाले होते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न . पहायला निघाले होते. याना पक्षाचे काहीच घेणे देणे नाही लंके प्रतिष्ठान राज्यात मोठे करायचे आहे. या कार्यक्रमासाठी गोरख जाधव, अर्जुन सोनवणे, नारायण राऊत, रघुनाथ हजारे, सुनिल फाटक, संजय जाधव अरुण दिवटे, दादा धस बापु मेहत्रे, मारूती मेहत्रे सह नागरिक उपस्थित होते
चौकट-
निवडून आल्यावर दुसऱ्याच दिवशी विधानभवनात जाणारा पहिला आमदार आहे. विधानभवनात अजित पवार यांची भेट घेऊन पारनेर मतदार संघात विकास कामाबाबत चर्चा केली. आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मार्च मध्ये अर्थसंकल्प असतो ते०हा आपल्या भागातील कामाचे निवेदन तातडीने माझ्याकडे पोहच करा. अर्थ संकल्पात सादर करता येईल.नगर तालुक्यात ४३ गावात जास्त लक्ष राहणार आहे केडगाव ते घोसपुरी रस्ता चे काम प्रथम मार्गी लावणार असल्याचे यावेळी दाते यांनी सांगीतले
चौकट- -माजी आमदारानी अकोळनेर गाव दत्तक घेतले होते . मात्र कुठल्याही प्रकारचे काम केले नाही.आमच्या गावाने मागील निवडणुकीत लिड दिले म्हणून निवडून आले . मात्र या निवडणूकीत आम्ही त्याचा पराभव केला.केडगाव घोसपुरी रस्ता अतिशय खराब झाला आहे. १५ ते वीस हजार लोकसख्या असणाऱ्या नागरिक या रस्त्यावरून जातात . या रस्त्याचा प्रश्न प्रथम मार्गी लावा
सरपंच – प्रतिक शेळके, अकोळनेर