स्टार हेल्थच्या 20 व्या वर्धापन दिनाचा उत्साहात सोहळा
नगर : स्टार हेल्थच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या सोहळ्यास क्लब सदस्य, सल्लागार, नेते व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात रीजनल हेड विक्रांत सर व AZM रणजित सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यांनी HHC, BNPL आणि क्लब मेंबरशिपचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगत या माध्यमातून सल्लागारांना सातत्यपूर्ण प्रगती व यशाच्या संधी कशा उपलब्ध होतात याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक यशस्वी सल्लागारांनी स्टार हेल्थमधील आपले अनुभव आणि यशस्वी प्रवास उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे कार्यक्रमात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
20 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सल्लागार व सदस्यांसाठी हेल्थ चेक-अप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वर्धापन दिन शाखास्तरीय स्पर्धेतील पात्र विजेत्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सल्लागारांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व क्लब सदस्य, सल्लागार, व कर्मचारी वर्गाचे आयोजकांनी आभार मानले.

