भातोडी येथे फ्रेंड्स क्रिकेट क्लबतर्फे भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :
ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धांमुळे तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण होते तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. अशा स्पर्धा प्रत्येक गावोगावी आयोजित केल्या गेल्या पाहिजेत, यामुळे युवकांना सकारात्मक दिशा मिळते आणि त्यांच्या कौशल्याला चालना मिळते. असे प्रतिपादन नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले
भातोडी ( ता. अहिल्यानगर ) येथे फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक, योगीराज गाडे, सुदर्शन गोहेर, संदिप गुंड, सरपंच विक्रम गायकवाड, उपसरपंच राजू पटेल, ग्रामपंचायत सदस्य सिराज पटेल, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर लबडे, यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी पंचायत समिती सदस्यबबन घोलप, सेवा संस्थेचे अध्यक्ष, विश्वनाथ कदम, निसार शेख, भाऊसाहेब धनपे, विक्रम लबडे, पापा पटेल, अशोक तरटे, रियाज शेख, समीर पटेल, ताज महंमद, पटेल, रफिक पटेल, अजिनाथ शिंदे, राजेंद्र भगत,सोमनाथ कांडके, सोमनाथ शिंदे, गणेश गुंड, गणेश शिंदे, योगेश लांडगे, वैभव शिंदे, अभय गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी ११ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धासाठी सिराज पटेल, मी आज पटेल, सादिक शेख, निशांत पटेल, सलमान पटेल, फिरोज शेख, राजू शेख, ख्वाजा शेख, इरफान पटेल, शाहीर शेख, असिफ शेख, अलीम, समीर सय्यद, अली, प्रवेश महज, अझहर पटेल उपस्थित होते.

