अनुक्रमांक १ ची लाट; प्रभाग १५ मध्ये विकासासाठी दत्ता गाडळकर ठरतात निर्णायक पर्याय
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रंगात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार दत्ता सोमनाथ गाडळकर यांच्या बाजूने वातावरण झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. ठोस विकासदृष्टी, लोकसेवेची बांधिलकी आणि स्पष्ट नेतृत्वामुळे दत्ता गाडळकर हे मतदारांची पहिली पसंती ठरत आहेत.
अनुक्रमांक १, चिन्ह – कमळ असलेल्या दत्ता गाडळकर यांनी प्रचारादरम्यान प्रभागातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटार, स्वच्छता, पथदिवे आणि नागरी मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने निधी आणून कामे केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
“फक्त आश्वासने नाही तर प्रत्यक्ष काम हेच माझं राजकारण आहे,” असे सांगत त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आहे. त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीमुळे युवक, महिला, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
प्रचार सभांमध्ये आणि घराघरातील भेटीतून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभाग १५ मध्ये ‘अनुक्रमांक १ हीच विकासाची दिशा’ हा नारा सर्वसामान्यांमध्ये रूढ होत आहे. येत्या निवडणुकीत प्रभागाचा विकासाचा श्रीगणेशा करण्यासाठी दत्ता गाडळकर यांना विजयी करण्याचा निर्धार मतदार व्यक्त करत आहेत.
अनुक्रमांक १ ची लाट; प्रभाग १५ मध्ये विकासासाठी दत्ता गाडळकर ठरतात निर्णायक पर्याय


