अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्रमांक 3 मध्ये ‘मशाल’ पेटली – जनतेसाठी 24×7 लढणारा सक्षम पॅनल मैदानात!
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा चारही प्रभागांचा मजबूत, अभ्यासू आणि आक्रमक उमेदवार पॅनल जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. विकास, पारदर्शकता आणि शून्य भ्रष्टाचार या ठाम भूमिकेसह हा पॅनल निवडणुकीच्या रणांगणात उतरला असून नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
“आपल्या कॉलसाठी धन्यवाद” ही केवळ औपचारिक ओळ न राहता, ती प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे नेतृत्व म्हणजे योगीराज शशिकांत गाडे. वर्षाचे 365 दिवस, 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध राहणारे योगीराज गाडे हे पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, रस्ते तसेच इतर नागरी समस्यांवर एक फोन कॉल किंवा WhatsApp संदेशावर तात्काळ दखल घेण्यासाठी ओळखले जातात. सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता, शून्य भ्रष्टाचार आणि करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचे श्रेय थेट नागरिकांनाच देण्याची ठाम भूमिका त्यांनी कायम जपली आहे.
प्रभाग क्रमांक 3 – शिवसेना (UBT) उमेदवार पॅनल
चिन्ह : मशाल
▪️ प्रभाग 3 अ – योगीराज शशिकांत गाडे
(BA, LLB V)
▪️ प्रभाग 3 ब – डॉ. नीलम विपुल वाखुरे
(Cosmetologist)
▪️ प्रभाग 3 क – अनिता प्रशांत दारकुंडे
(B.Sc., B.Ed., D.Pharma)
▪️ प्रभाग 3 ड – इंजि. केतन सुहास क्षीरसागर
(M.E. Civil)
हे चारही उमेदवार उच्च शिक्षित, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. विकासकामे करताना केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष काम, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक विकास हीच त्यांची ओळख आहे.
“सर्वांना सोबत घेऊन विकास” ही घोषणा नसून, हीच या पॅनलची कार्यपद्धती आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांनी विकास, स्वच्छ कारभार आणि जनतेसाठी सदैव तत्पर नेतृत्वासाठी चारही उमेदवारांना मतदान करून ‘मशाल’ चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन नागरिकांमधून होत आहे.
✊ अहिल्यानगरच्या विकासासाठी – प्रभाग क्रमांक 3 मध्ये ‘मशाल’ हाच एकमेव विश्वास! ✊
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्रमांक 3 मध्ये ‘मशाल’ पेटली – जनतेसाठी 24×7 लढणारा सक्षम पॅनल मैदानात!


